Amitabh Bachchan : माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही ! कोट्यवधींच्या बंगल्यात अमिताभ बच्चन यांची फक्त एक खोली; जया बच्चन यांच्याबद्दल म्हणाले…

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' मध्ये मोठा खुलासा केला आहे.

Amitabh Bachchan : माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही ! कोट्यवधींच्या बंगल्यात अमिताभ बच्चन यांची फक्त एक खोली; जया बच्चन यांच्याबद्दल म्हणाले...
| Updated on: Nov 27, 2026 | 7:43 PM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय क्विझ शोमुळे चर्चेत आहेत. या कार्यक्रमात ते स्पर्धकांशी संवाद साधताना अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील मजेशीर किस्सेही सांगतात. नुकतंच त्यांनी आपल्या मुंबईतील ‘जलसा’ या आलिशान बंगल्याबद्दल एक भन्नाट खुलासा केला. या बंगल्यात आपल्यासाठी फक्त एक छोटीशी खोली असल्याचं त्यांनी सांगितलं. तर घरातील बाकीच्या खोल्या पत्नी जया बच्चन यांच्यासाठी असल्याचंही त्यांनी मिश्किलपणे नमूद केलं.

अमिताभ बच्चन यांची फक्त एक छोटीशी खोली!

Loading...

‘कौन बनेगा करोडपती’च्या एका भागात दीपक नावाचा स्पर्धक सहभागी झाला होता. दीपक हा म्युरल आर्टिस्ट असून त्याच्या कलेने अमिताभ बच्चन चांगलेच प्रभावित झाले. त्यानं म्युरल आर्टविषयी माहिती दिल्यानंतर अमिताभ यांनी त्याच्या कलेचं कौतुक केलं. आपल्या खोलीच्या भिंतीवरही अशा प्रकारची कलाकृती लावण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

त्या कलाकृतीचं कौतुक करत अमिताभ म्हणाले, ‘भिंतीवरची ही कला अप्रतिम आहे आणि मला नुकतंच याबद्दल कळलं आहे. मलाही माझ्या खोलीच्या भिंतींवर असंच चित्र काढायचं आहे. तेव्हा मी तुम्हाला सांगेन.’ बिग बी म्हणाले की, त्यांच्याकडे फक्त एकच खोली आहे. बिग बी पुढे म्हणाले, ‘मी खोली म्हणतोय कारण माझी एक छोटी खोली आहे आणि आमच्या घरातील बाकीच्या खोल्या मॅडम (जया बच्चन) यांच्यासाठी आहेत.’

 

जया बच्चन यांच्याबद्दल काय म्हणाले बिग बी? 

बिग बी पुढे म्हणाले, ‘त्यांच्यासाठी एक जेवणाची खोली, एक बसण्याची खोली आहे आणि बाकीच्या खोल्या त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी स्वतंत्र आहेत. त्यामुळे माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही.’

दरम्यान, बिग बी आणि जया यांचं लग्न 3 जून 1973 रोजी झालं. त्यांचा विवाहसोहळा एक खाजगी कार्यक्रम होता, ज्यात फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यांना अभिषेक नावाचा मुलगा आणि श्वेता नावाची मुलगी अशी दोन मुलं आहेत.  अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते ‘कल्की 2898 एडी 2’ मध्ये दिसणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us