Amitabh Bachchan : हल्ल्याचा कट उधळला म्हणून नव्हे, तर पँटचा बेल्टच…अमिताभ बच्चन यांची सारवासारव, चौफेर टीका होताच महानायक बॅकफूटवर

Amitabh Bachchan Post : अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Amitabh Bachchan : हल्ल्याचा कट उधळला म्हणून नव्हे, तर पँटचा बेल्टच...अमिताभ बच्चन यांची सारवासारव, चौफेर टीका होताच महानायक बॅकफूटवर
| Updated on: Nov 18, 2026 | 4:57 PM

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतात. ते अशा छोट्या पोस्ट्स शेअर करतात, ज्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडतो की त्यांचा नेमका अर्थ काय आहे. अलीकडेच, त्यांची एक पोस्ट पुन्हा चर्चेत आली होती. तिचा अर्थ कोणालाच कळला नाही. आता, बिग बींनी स्वतः एका नवीन पोस्टद्वारे त्या जुन्या पोस्टचा अर्थ स्पष्ट केला आहे.

15 नोव्हेंबर रोजी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिलेलं की, ‘मी वाचलो.’ या दोन शब्दांच्या पोस्टची खूप चर्चा झाली. त्याचा अर्थ काय, ते कशातून वाचले, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता होती. चाहत्यांनाही त्यांची काळजी वाटत होती. मात्र, आता तीन दिवसांनंतर, बिग बींनी एक नवीन पोस्ट करून आपल्या पोस्टचा संदर्भ स्पष्ट केला आहे.

Loading...

केबीसीच्या सेटवर काय घडलं?

18 नोव्हेंबर रोजी एका पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिलं की, ‘केबीसीच्या शूटिंगदरम्यान माझ्या पॅन्टचा बेल्ट तुटला. मी पटकन नाडी बांधली – ‘मी वाचलो.’ आता त्यांची ही पोस्टसुद्धा चर्चेचा विषय बनली आहे.

 

 

दरम्यान, अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या क्विझ टीव्ही रिॲलिटी शोमध्ये व्यग्र आहेत. या शोचा 18वा सीझन 10 ऑगस्ट 2026 पासून सोनी टीव्हीवर प्रसारित झाला. या महिन्याच्या सुरुवातीला (नोव्हेंबरमध्ये) अमिताभ बच्चन यांना एक छोटी आरोग्य समस्या निर्माण झाली होती. हवामानामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली. यामुळे त्यांनी केबीसीचं शूटिंग केलं नाही.

अमिताभ बच्चन 10 नोव्हेंबर पासून शूटिंगवर परतले. 12 नोव्हेंबर रोजी निर्मात्यांनी नवीन एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित केला आणि 16 नोव्हेंबरपासून नवीन एपिसोड प्रसारित होण्यास सुरुवात झाली. दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी अमिताभ बच्चन यांची ‘बच गये’ ही पोस्ट समोर आली. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ते शेवटचे 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘120 बहादूर’ या चित्रपटात दिसले होते. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘सेक्शन 84’ आणि ‘कल्की 2898 एडी’च्या सिक्वेलचा समावेश आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us