AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युक्तिवाद पूर्ण, पण कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढवलं, शिंदे गटाचा युक्तिवाद संपताच…, सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे वकील धृव मेहता यांनी जोरदार युक्तिवाद केला, अखेर आज शिंदे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

युक्तिवाद पूर्ण, पण कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढवलं, शिंदे गटाचा युक्तिवाद संपताच..., सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी
उद्धव ठाकरे. एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 18, 2026 | 4:42 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. आज शिवसेना शिंदे गटाचे वकील धृव मेहता यांनी  शिवसेना शिंदे गटाची बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी 2019 मध्ये कर्नाटकात स्थापन झालेल्या सरकारचा देखील दाखला दिला.   या प्रकरणात दहाव्या अनुसूचीनुसार कारवाई करता येणार नाही, शिंदेंच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला नाही, असा युक्तिवाद यावेळी धृव मेहता यांच्याकडून करण्यात आल आहे. तसेच यावेळी युक्तिवाद करताना त्यांनी भाजप आणि शिवसेना युतीचा देखील दाखल दिला.

निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती होती. परंतु निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी ही युती तोडण्यात आली.  ही युती तोडण्यात आल्याने पदाधिकारी नाराज झाले होते, असंही यावेळी धृव मेहता यांनी म्हटलं. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचच सरकार होतं. परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने सरकार वाचवण्यासाठी शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, म्हणजे हे सरकार कोसळंलच नाही, असा दावाही यावेळी धृव मेहता यांनी केला.

दरम्यान आज शिवसेना शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली आहे. मात्र त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयातत रिजॉइंडरची मागणी केली आहे. मला रिजॉइंडर द्यायचा आहे, त्यासाठी मला काही वेळ द्याल अशी मागणी कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केली आहे.  दरम्यान कपिल सिब्बल हे आता पुन्हा एकदा युक्तिवाद करणार असल्याने शिवसेना शिंदे गटाची चिंता वाढली आहे. रिजॉइंडरमध्ये कपिल सिब्बल नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे वकील धृव मेहता यांनी सलग तीन सुनावणीमध्ये युक्तिवाद केला होता. अखेर आज त्यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला आहे.

Follow Us
बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं...
Shambhuraj Desai : बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं काय म्हणाले?
शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या
Shivsena Hearing Case : शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हिपच्या वैधतेवर उपस्थित केले प्रश्न
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसी.....
Shivsena UBT : बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसींविरोधात मुंबई महापालिकेत जोरदार आंदोलन
हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; वडेट्टीवारांचं शिंदे
Vijay Wadettiwar : हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; विजय वडेट्टीवारांचं शिंदे सेनेला थेट आव्हान
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... सुषमा अंधारे संतापल्या
Sushma Andhare : बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... शायना एनसी यांच्यावर सुषमा अंधारे संतापल्या
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....
Shivsena : सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला
शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली....
Sonia Gandhi's Book : Shivsena : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही...; शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या
Supriya Sule : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या मदतीची मागणी!
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस विकसित