AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jackie Shroff : महेश मांजरेकर मला सिनेमात घेतच नाहीये…बॉलिवूड सुपरस्टारची खंत, व्यक्त केली मराठीत काम करण्याची इच्छा

Jackie Shroff on Mahesh Manjrekar : जॅकी श्रॉफ यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Jackie Shroff : महेश मांजरेकर मला सिनेमात घेतच नाहीये...बॉलिवूड सुपरस्टारची खंत, व्यक्त केली मराठीत काम करण्याची इच्छा
| Updated on: Nov 18, 2026 | 4:11 PM
Share

बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आपल्या अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी चित्रपटांसोबतच त्यांनी मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्याबद्दल मिश्किल तक्रारही केली आहे.

काय म्हणाले जॅकी श्रॉफ?

जॅकी श्रॉफ आणि महेश मांजरेकर यांच्यात चांगली मैत्री आहे. मात्र, एवढी चांगली मैत्री असूनही महेश मांजरेकर आपल्याला त्यांच्या चित्रपटांमध्ये भूमिका देत नाहीत, असं जॅकी यांनी म्हटलं आहे. महेश स्वतःच सर्व गोष्टी करतात, पण मित्राला संधी देत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी गंमतीशीर नाराजी व्यक्त केली.

‘मुंबई टाइम्स‘ला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ म्हणाले की, ‘महेश मांजरेकर माझा चांगला मित्र आहे. ‘पिता’ सिनेमात त्यानं मला चांगली भूमिका दिली होती. पण आता तो मला घेतच नाहीये (हसतात) मला सांगतो, की तुझ्यासाठी भूमिका लिहिल्या आहेत. पण नंतर चित्रपट पाहिला, की तो स्वतःच सगळं करतो! पण, महेश खूप चांगला माणूस आहे. त्याच्यासोबत पुन्हा काम करायला आवडेल. गंमतीत म्हणायचं झालं तर ‘कुणी मराठी सिनेमा देता का मराठी सिनेमा ?’

भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या पॅन इंडिया चित्रपटांचं प्रमाण वाढत आहे. याबद्दल बोलताना जॅकी श्रॉफ यांनी प्रेक्षकांच्या बदलत्या दृष्टिकोनावर भाष्य केलं. त्यांच्या मते, आता प्रेक्षक चित्रपटाची भाषा पाहण्यापेक्षा त्यातील कथा आणि आशयाला अधिक महत्त्व देतात. ‘प्रेक्षकांना आता भाषा नाही, तर चांगली गोष्ट आवडते. कथा दमदार आणि आशय चांगला असला पाहिजे. मग ती कोणत्याही भाषेतली असो, प्रेक्षक ती स्वीकारतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चित्रपटसृष्टीला केवळ बॉलिवूड म्हणू नका. ही भारतीय चित्रपटसृष्टी आहे. आपल्याकडे अनेक भाषांमध्ये उत्तम चित्रपट तयार होत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीही खूप चांगलं काम करत आहे.’ असंही जॅकी श्रॉफ म्हणाले.

Follow Us
बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं...
Shambhuraj Desai : बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं काय म्हणाले?
शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या
Shivsena Hearing Case : शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हिपच्या वैधतेवर उपस्थित केले प्रश्न
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसी.....
Shivsena UBT : बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसींविरोधात मुंबई महापालिकेत जोरदार आंदोलन
हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; वडेट्टीवारांचं शिंदे
Vijay Wadettiwar : हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; विजय वडेट्टीवारांचं शिंदे सेनेला थेट आव्हान
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... सुषमा अंधारे संतापल्या
Sushma Andhare : बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... शायना एनसी यांच्यावर सुषमा अंधारे संतापल्या
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....
Shivsena : सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला
शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली....
Sonia Gandhi's Book : Shivsena : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही...; शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या
Supriya Sule : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या मदतीची मागणी!
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस विकसित