AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिताभ बच्चन यांना मराठीत ‘ती’ पोस्ट करणं पडलं भारी, मागावी लागली माफी

Amitabh Bachchan Marathi Post: मराठीत लिहिलेल्या 'त्या' पोस्टमुळे अमिताभ बच्चन ट्रोल, अखेर मागावी लागली माफी, काय आहे 'ती' पोस्ट, सध्या बिग बींची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, सर्वत्र त्यांच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

अभिताभ बच्चन यांना मराठीत 'ती' पोस्ट करणं पडलं भारी, मागावी लागली माफी
फाईल फोटो
| Updated on: Sep 09, 2025 | 8:06 AM
Share

Amitabh Bachchan Marathi Post: महानायक अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे बिग बी ट्रोल देखील होत असतात. आता देखील त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांनी एक्सवर लालबागच्या राजाचा एक फोटो पोस्ट करत ‘गणपति बप्पा मोरया… लाल बाग च राजा…’ असं लिहिलं. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची चूक पकडली आहे.

‘लाल बाग च राजा…’ असं मराठीत लिहिण्यात चूक झाल्यानंतर बिग बींनी पुन्हा एक पोस्ट लिहिली आणि माफी देखील मागितली. बिग बी म्हणाले, ‘माझ्या एका शुभचिंतकाने सांगितलं, मी ट्वीट चुकीचं केलं आहे. त्यामुळे दुरुस्त करत आहे. ‘लालबाग चा राजा..’ क्षमा प्रार्थी…’ असं बिग बी नंतरच्या ट्विटमध्ये म्हणाले. सध्या अमिताभ बच्चन यांचे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी स्वतःची चूक दुरुस्त केली. पण अनेकांनी त्यांना ट्रोल केलं, तर अनेकांनी त्यांचं कौतुक देखील केलं. गेल्या इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात राहात आहात, तरी देखील मराठी येत नाही… असं अनेक जण बिग बी यांना म्हणाले आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तुम्ही हे गुगल ट्रान्सलेटमधून केलं आहे. ते चुकीचं ट्रान्सलेट झालं आहे..’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मराठी भाषा कठिण नाही, फक्त मनापासून शिकता आली पाहिजे…’

सुपरस्टार रजनीकांत यांचं दिलं उदाहरण..

याच दरम्यान, अन्य एका नेटकऱ्यांना अमिताभ बच्चन यांनी सुपरस्टार रजनीकांत यांचं उदाहरण दिलं. ‘सर तुम्ही बरोबर बोलत आहात… रजनीकांत मराठी असून सुद्धा तामिळनाडूला स्वतःची मातृभूमी मानतात आणि तामिळ भाषेला त्यांनी पूर्णपणे आत्मसात देखील केलं आहे. त्यांचं बालपण कर्नाटकात गेलं. त्यामुळे त्यांना कन्नड भाषा माहिती आहे. पण रजनीकांत मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये देखील बोलतात आणि महाराष्ट्राने तुम्हाला इतकं मोठं केलं आहे, पण तरीही तुम्हाला नीट मराठी बोलता येत नाही याचं आम्हाला वाईट वाटतं.’ सध्या सर्वत्र बिग बींच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?