AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ-जया यांचं 53 वर्षांपूर्वीचं सुपरहिट गाणं, जे प्रत्येक कपलचं आवडतं, आजही अनेक लोक…

अमिताभ बच्चन आणि जया यांचं 53 वर्षांपूर्वीचं सर्वात सुपरहिट गाणं, जे आजही प्रत्येक कपलच्या मोबाईलमध्ये बघायला मिळतं. आजही हे गाणं प्रचंड सुपरहिट.

अमिताभ-जया यांचं 53 वर्षांपूर्वीचं सुपरहिट गाणं, जे प्रत्येक कपलचं आवडतं, आजही अनेक लोक...
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 15, 2026 | 5:16 PM
Share

जुन्या हिंदी चित्रपटातील काही गाणी अशी आहेत, जी ऐकताच त्या काळातील आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं ‘तेरी बिंदिया रे’ हे त्यापैकीच एक गाणं आहे. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिमान चित्रपटातील हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.

या गाण्याची खास गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी 3 जून 1973 रोजी लग्न केलं आणि त्यानंतर अवघ्या काही आठवड्यांनी, 27 जुलै 1973 रोजी ‘अभिमान’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे पडद्यावर पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणाऱ्या या जोडीकडे प्रेक्षकांनी विशेष उत्सुकतेने पाहिलं.

पती-पत्नीमधील प्रेम व्यक्त करणारं गाणं

‘तेरी बिंदिया रे’मध्ये जया बच्चन यांचा साधा, मोहक अंदाज पाहायला मिळतो. कपाळावरील बिंदी, दागिने आणि नववधूसारखा लाजरा भाव त्यांच्या व्यक्तिरेखेला अधिक सुंदर बनवतो. अमिताभ बच्चनही प्रेमाने त्यांच्याकडे पाहताना दिसतात. बिंदी, झुमके आणि बांगड्यांसारख्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून पती-पत्नीमधील प्रेम या गाण्यात सुंदरपणे व्यक्त करण्यात आलं आहे.

या गाण्यासाठी भव्य सेट किंवा मोठ्या डान्सची गरज भासली नाही. अमिताभ-जया यांचे सहज भाव आणि त्यांच्यातील केमिस्ट्री हीच गाण्याची खरी ताकद ठरली. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजाने गाण्याला आणखी वेगळी उंची मिळाली. संगीतकार एस.डी. बर्मन आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या योगदानामुळे हे गाणं अजरामर झालं.

5 दशकांनंतरही गाण्याची क्रेझ कायम

ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित अभिमानमध्ये अमिताभ बच्चन यांनी गायक सुबीर, तर जया यांनी उमा ही भूमिका साकारली होती. लग्नानंतर उमाला पतीपेक्षा अधिक यश मिळू लागल्याने त्यांच्या नात्यात अहंकार आणि दुरावा निर्माण होतो. त्यामुळे चित्रपटाच्या कथेत संगीतासोबतच पती-पत्नीच्या नात्यालाही महत्त्वाचं स्थान आहे.

पाच दशकांहून अधिक काळ उलटूनही ‘तेरी बिंदिया रे’ची मोहिनी कायम आहे. अमिताभ-जया यांची सुंदर केमिस्ट्री, लता-रफी यांचा मधुर आवाज आणि साध्या शब्दांत व्यक्त केलेलं प्रेम यामुळे हे गाणं आजही जुन्या हिंदी चित्रपटाच्या रोमँटिक आठवणी जागवणारं ठरतं.

Follow Us
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप