अक्षय कुमार पैशांसाठी काहीही…, अनिल कपूर यांचे धक्कादायक विधान, थेट म्हणाले

अक्षय कुमार याचे गेल्या काही दिवसांपासून चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला सेल्फी हा चित्रपट देखील अक्षय कुमार याचा फ्लाॅप गेला. अक्षय कुमार हा बाॅलिवूडचा असा अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला तब्बल चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

अक्षय कुमार पैशांसाठी काहीही..., अनिल कपूर यांचे धक्कादायक विधान, थेट म्हणाले
| Updated on: Jul 17, 2023 | 7:53 PM

मुंबई : द कपिल शर्मा शो हा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. या शोमध्ये बाॅलिवूडचे (Bollywood) स्टार हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी नेहमीच पोहचतात. विशेष म्हणजे काॅमेडीचा तडका कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्या शोमध्ये बघायला मिळतो. विशेष म्हणजे फक्त द कपिल शर्मा हा शोच नाही तर आता कपिल शर्मा हा बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्येही काम करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्मा याचा चित्रपट रिलीज झाला. सर्कस या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा याच्या शोमध्ये रोहित शेट्टी, रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि चित्रपटाची संपूर्ण टिम पोहचली होती. यावेळी मोठा धमाका झाला.

आता कपिल शर्मा याचा शो काही दिवसांसाठी बंद होणार आहे. परत एकदा नवीन सीजन घेऊन कपिल शर्मा हा येणार आहे. विशेष म्हणजे अनिल कपूर हा फिनालेला धमाका करताना दिसत आहेत. याचा एक प्रोमोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. कपिल शर्मा आणि अनिल कपूर हे फिनालेच्या दिवशी प्रेक्षकांना पोट धरून हसवणार हे नक्कीच आहे.

प्रोमोच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कपिल शर्मा हा म्हणतो की, मागच्या वेळी देखील फिनालेसाठी तुम्ही शोमध्ये आले होते. यावर बोलताना थेट अक्षय कुमार याला टार्गेट करताना अनिल कपूर हे दिसले आहेत. अनिल कपूर म्हणतात की, होय….अक्षय कुमार या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये पैसे घेऊन येतो.

पुढे अनिल कपूर म्हणाले की, मी द कपिल शर्मा शोच्या फिनालेला पैसे न घेता येतो, हाच फरक आमच्यामध्ये आहे. म्हणजेच आता हे स्पष्ट झाले आहे की, कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावण्यासाठी अक्षय कुमार हा तगडी फिस घेतो. अनिल कपूर हे कपिल शर्माच्या शोमध्ये येण्यासाठी कोणत्याही प्रकारची फिस घेत नाहीत.

काही दिवसांपूर्वीच मिली या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी जान्हवी कपूर आणि बोनी कपूर हे द कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी बोनी कपूर हे जान्हवी कपूर हिची पोलखोल करताना दिसले. जान्हवी कपूर हिचे रूम खूप जास्त खराब असते. ती कधीच रूम व्यवस्थित ठेवत नसल्याचे सांगतानाही बोनी कपूर हे दिसले होते.