
शनाया कपूर चित्रपटसृष्टीतली एक प्रसिद्ध स्टार किड्स आहे. शनायानं अजून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं नसलं तरी सोशल मीडियावर तिची चांगली फॅन फॉलोइंग आहे.

शनाया अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी तिच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. लोकांना तिचे व्हिडीओ खूप पसंतीस येतात.

संजय कपूर यांची मुलगी आणि अनिल कपूर यांची भाची शनायानं आता एक नवं फोटोशूट केलं आहे, या फोटोशूटचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोशूटमध्ये शनाया खूप ग्लॅमरस दिसत आहे.

शनायानं या फोटोंमधे, व्हाईट कलरचा ट्रान्सपरंट ड्रेस कॅरी केला आहे, सोबतच तिनं मोठी टोपीसुद्धा कॅरी केली आहे. या किलर स्टाईलमधील तिचं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शनायाचं हे फोटोशूट तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. सोबतच तिच्या या फोटोंवर चाहते कमेंटसुद्धा देखील करत आहेत. मात्र अशातच काही लोक शनायाला ट्रोल सुद्धा करत आहेत.