
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले प्रसिद्ध हिंदी चित्रपट गायक उदित नारायण यांच्या चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. एका लाईव्ह शो दरम्यान एका महिला चाहत्याच्या ओठांवर किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर सर्व बाजूंनी टीकेची झोड उठली. त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली.
त्यानंतर त्यांचे अनेक जुने व्हिडीओही व्हायरल झाले ज्यामध्ये उदित नारायण यांनी अनेक फॅन्ससोबत असाच प्रकार केल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर लाइव्ह शो दरम्यान प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि अलका याज्ञिक यांना अचानक किस करतानाचा जुना व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
उदित नारायण यांचा अजून एक व्हिडीओ व्हायरल
जुने व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही त्यांना बरीच टीका सहन करावी लागली. आता त्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो आधीच्या व्हिडीओशी जोडलेला असल्याचं म्हटले जात आहे. व्हायरल होत असलेल्या या नवीन व्हिडीओमध्ये, उदित नारायण सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका महिला चाहतीला किस करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये तो आधीच्या व्हायरल व्हिडिओप्रमाणेच चाहतीच्या ओठांवर किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी पुन्हा चर्चा सुरु करत टीका करण्यास आणि प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
” विकृत माणूस आहे,”… नेटकऱ्यांकडून टीका
या व्हिडीओवर एका युजरने कमेंट केली आहे की “वाह, हा एक विकृत माणूस आहे,” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “हा एक गुन्हेगार आहे.” काही नेटकऱ्यांनी यावर मजेदार मीम्स देखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये इमरान हाश्मी आणि उदित नारायण यांची तुलना करण्यात आली आहे. याशिवाय सोशल मीडियावर इतरही अनेक लोक उदित यांच्यावर टीका करत आहेत.
“चाहत्यांना मला भेटण्याची संधी मिळताच….”
पहिल्यांदा व्हायरल झालेल्या व्हिडीओवर जेव्हा त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती तेव्हा उदित नारायण यांनी स्पष्टीकरण दिले होते.
ते अलिकडेच एका मुलाखतीत म्हणाले होते की, ‘चाहते खूप वेडे आहेत… मी असा नाही आहे, मी सुसंस्कृत आहे. काही लोक याद्वारे त्यांचे प्रेम दाखवतात. त्यामुळे हा संदेश पसरवण्याचा काय अर्थ आहे? गर्दीत बरेच लोक असतात आणि आमच्यासोबत बॉडीगार्डही असतात, चाहत्यांना मला भेटण्याची संधी मिळताच ते स्टेजजवळ येऊन भेटतात म्हणून काही जण हस्तांदोलन करण्यासाठी पुढे येतात, काही जण हाताचे किस घेतात. या सर्व गोष्टी अगदी सामान्य असून याकडे इतके लक्ष देऊ नये.” असं म्हणत त्यांनी आपली बाजू सावरली होती.
व्हायरल झालेला व्हिडीओ नवा की जुना?
मात्र आता पुन्हा एकदा नव्यानं व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओबाबतही अनेक चर्चा होत असून हा व्हिडीओ नक्की आताच झालेल्या लाइव्ह शोचा आहे की हा व्हिडीओ जुना आहे, हे मात्र अजून नक्की झालेलं नाही.
मात्र हा व्हिडीओ उदित नारायण यांच्या लाइव्ह शो दरम्यानचा असून त्यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या महिलेला किस केल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे जर हा व्हिडीओ नुकत्याच झालेल्या लाइव्ह शोमधलाच असल्याचं समोर आलं तर आधी एक व्हिडीओमुळे झालेल्या बदनामीला झुगारून पुन्हा तीच चूक केल्याबद्दल नेटकऱ्यांकडून उदित नारायण यांच्यावर प्रचंड रोष व्यक्त केला जाईल एवढं नक्की.