AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anupam Kher: मंदिरात लग्न, दुसऱ्याच दिवशी पत्नीला सोडून गेले; अनुपम खेर यांच्या पहिल्या लग्नाबाबत भावाचा मोठा खुलासा; नेमकं काय घडलं?

Anupam Kher: अनुपम खेर यांचे भाऊ राजू खेर यांनी त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल काही महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. अनुपम खेर यांचं लग्न एका दिवसातच मोडल्याचं त्यांनी सांगितलं.

Anupam Kher: मंदिरात लग्न, दुसऱ्याच दिवशी पत्नीला सोडून गेले; अनुपम खेर यांच्या पहिल्या लग्नाबाबत भावाचा मोठा खुलासा; नेमकं काय घडलं?
अनुपम खेर, मधुमालती खेर, किरण खेर
| Updated on: Oct 04, 2026 | 11:25 AM
Share

Anupam Kher: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल अनेकांना माहिती आहे. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी आजही फारशा चर्चेत आलेल्या नाहीत. अभिनेत्री किरण खेर यांच्याशी 1985 मध्ये झालेलं त्यांचं लग्न सर्वश्रुत आहे. पण त्याआधी अनुपम खेर यांचं आणखी एक लग्न झालं होतं. अभिनेत्री मधुमालती कपूर यांच्यासोबतचं हे नातं मात्र लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत संपुष्टात आलं. आता अनुपम यांचे भाऊ आणि अभिनेते राजू खेर यांनी या जुन्या नात्याबाबत काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

दोन-तीन वर्षांचं प्रेम अन् अचानक लग्न

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राजू खेर यांनी अनुपम आणि मधुमालती यांच्या नात्याबद्दल सांगितलं. दोघंही लग्नाआधी साधारण दोन ते तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर अचानक लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोघांनी लखनऊमधील एका मंदिरात लग्न केलं. विशेष म्हणजे या लग्नाला अनुपम यांच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. राजू म्हणाले, लग्नाचा निर्णय फार घाईत झाला. मधुमालती यांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि अनुपम यांनीही त्याला होकार दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लग्न झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, लग्नानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली.

‘मी इथे राहू शकत नाही’ म्हणत निघून गेले

राजू खेर यांनी सांगितलं की, लग्न झाल्यानंतर अनुपम लखनऊमध्ये फार काळ थांबले नाहीत. अवघ्या एक-दोन दिवसांत त्यांनी तिथून जाण्याचा निर्णय घेतला. ‘मी इथे राहू शकत नाही,’ असं सांगून ते निघून गेले. त्यानंतर काही काळ ते शिमला आणि दिल्लीला गेले. त्यामुळे प्रेमसंबंधानंतर झालेलं हे लग्न प्रत्यक्षात अत्यंत कमी काळ टिकल्याचं समोर आलं आहे.

लग्न का मोडलं? भावाने दिलं स्पष्ट उत्तर

अनुपम आणि मधुमालती यांच्यात नेमकं काय बिनसलं, याचा शोध घेण्याचा प्रयत्न राजू खेर यांनी कधीच केला नाही. त्यांच्या मते, हा दोघांचा वैयक्तिक विषय होता आणि त्यामागचं खरं कारण अनुपम आणि मधुमालती हे दोघेच जाणू शकतात. त्या काळात अनुपम अतिशय सरळ स्वभावाचे होते, तर मधुमालती यांचा स्वभाव अधिक खंबीर असल्याचं राजू यांनी नमूद केलं. त्यामुळे या नात्याबद्दल तर्क-वितर्क करण्यापेक्षा त्यांनी भावाच्या खासगी आयुष्याचा आदर केला.

या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे अनुपम यांच्या कुटुंबालाच त्यांच्या लग्नाची सुरुवातीला माहिती नव्हती. लग्न मंदिरात आणि कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थितीत झाल्याने घरच्यांना अनुपम यांनी लग्न केल्याचं कळलंच नव्हतं. नंतर हे नातं संपल्यानंतरही राजू यांनी त्यामागची कारणं जाणून घेण्याचा आग्रह धरला नाही.

या काळात अनुपम खेर अद्याप बॉलिवूडमध्ये स्थिरावले नव्हते. अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न घेऊन त्यांनी मुंबई गाठली आणि 1984 मध्ये महेश भट्ट यांच्या ‘सारांश’ चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पुढे त्यांनी आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली. मधुमालती कपूर यांनीही पुढे लेखक-दिग्दर्शक रंजीत कपूर यांच्याशी लग्न केलं. दुसरीकडे अनुपम खेर यांच्या आयुष्यात किरण खेर आल्या आणि 1985 मध्ये दोघांनी लग्न केलं. आज या नात्याला अनेक दशके झाली आहेत. अनुपम यांच्या पहिल्या लग्नाची ही कहाणी मात्र आता पुन्हा चर्चेत आली आहे.

Follow Us
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई