AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आतापर्यंत एकही फ्लॉप चित्रपट न देणारा अभिनेता, लुकमुळे शाळेत सहन करायचा टोमणे

10 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केली प्रचंड कमाई. यामधील अभिनेत्याने आतापर्यंत दिला नाही एकही फ्लॉप चित्रपट. कोण आहे हा अभिनेता?

आतापर्यंत एकही फ्लॉप चित्रपट न देणारा अभिनेता, लुकमुळे शाळेत सहन करायचा टोमणे
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 11, 2026 | 5:37 PM
Share

शालेय जीवनात आपल्या लुक्समुळे टोमणे सहन करणारा एक मुलगा आज बॉक्स ऑफिसवर सुपरहिट किंग बनला आहे. 10 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या त्याच्या नव्या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ही यशोगाथा आहे प्रदीप रंगनाथनची, ज्याने आपल्या टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

एका कार्यक्रमात प्रदीप रंगनाथनने सांगितले की, लहानपणी त्याच्या दिसण्यावरून अनेकजण त्याची खिल्ली उडवत असत. मात्र, त्याने कधीही हार मानली नाही. त्या टोमण्यांना त्याने आपल्या ताकदीत बदलले आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आज मोठ्या पडद्यावर राज्य करत आहे.

‘Dude’ ठरला सुपरहिट

प्रदीप रंगनाथनचा Dude हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या 6 दिवसांतच जगभरात 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. हा त्याचा सलग तिसरा हिट चित्रपट ठरला. या चित्रपटात ममिता बैजू देखील प्रमुख भूमिकेत दिसली होती. चित्रपटाची कथा, संगीत आणि दिग्दर्शन यांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

प्रमोशनदरम्यान त्याला तुम्ही हिरोसारखे दिसता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने शांत आणि आत्मविश्वासपूर्ण उत्तर दिले. ज्यामुळे त्याचे सोशल मीडियावर मोठे कौतुक होत आहे.

‘LIK: Love Insurance Kompany’ची जोरदार सुरुवात

10 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या LIK: Love Insurance Kompany या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून चांगली कमाई केली आहे. पहिला दिवस 6.85 कोटी रुपये. दुसरा दिवस 7.93 कोटी रुपये तर तिसऱ्या दिवशी 9.93 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे. या आकड्यांवरून हा चित्रपट पुढील काळात आणखी मोठी कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोमाली, लव टुडे आणि ड्रॅगन या चित्रपटांच्या यशानंतर प्रदीप रंगनाथनचे नाव हिटची हमी बनले आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये तरुणांना आवडेल अशी ताजी कथा आणि मजबूत कनेक्ट पाहायला मिळतो. त्यामुळे लुक्सवरून हेटाळणी सहन करणाऱ्या मुलापासून ते बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या स्टारपर्यंतचा प्रदीप रंगनाथनचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याच्या मेहनतीमुळे आणि आत्मविश्वासामुळे त्याने आज यशाचे शिखर गाठले असून, तो अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

Follow Us
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश