AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ए आर रेहमान – सायरा बानू यांच्या घटस्फोटावर वकील म्हणाल्या, ‘दोघे अद्यापही विवाहित…’

AR Rahman-Saira Banu Divorce: 'दोघे अद्यापही विवाहित...', ए आर रेहमान - सायरा बानू यांच्या घटस्फोटावर वकिलांचं मोठं वक्तव्य, नक्की काय आहे प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून ए आर रेहमान खासगी आयुष्यामुळे चर्चेत...

ए आर रेहमान - सायरा बानू यांच्या घटस्फोटावर वकील म्हणाल्या, 'दोघे अद्यापही विवाहित...'
| Updated on: Nov 23, 2024 | 8:52 AM
Share

AR Rahman-Saira Banu Divorce: भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. लग्नाच्या 29 वर्षांनंतर ए आर रेहमान आणि सायरा बानू यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्वत्र एर आर रेहमान यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. खुद्द ए आर रेहमान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, प्रसिद्ध घटस्फोट वकील वंदना शाह यांनी दोघांच्या नात्याबद्दल मोठं सत्य सांगितलं आहे.

ए आर रेहमान आणि सायरा बानू यांचा घटस्फोट झाला नसल्याचं वक्तव्य वंदना शाह यांनी केलं आहे. वंदना शाह म्हणाल्या की, सामान्य लोकांप्रमाणेच प्रसिद्ध लोकांच्या घटस्फोटाची कारणेही सारखीच असतात. रहमान आणि सायरा बानू यांच्या वेगळे होण्याच्या निर्णयामागील कारण विचारले असता त्यांनी गोपनीयतेचा हवाला दिला. दोघांमध्ये काहीतरी घडले असावे, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला, असे त्या म्हणाले.

अद्याप घटस्फोट झालेला नाही…

वंदना शाह म्हणाल्या, ‘अद्याप घटस्फोट झालेला नाही दोघे अद्यापही विवाहित आहेत. दोघे त्यांच्यामध्ये असलेले मतभेद दूर करु शकलेले नाहीत. निवेदन जारी करत आम्ही दोघांमध्ये काही मतभेद आहेत आणि ते मिटले जाऊ शकत नाहीत…. असं म्हटलं होतं. घटस्फोट झाला आहे असा उल्लेख कुठेच करण्यात आलेला नाही… घटस्फोटाची प्रक्रिया सुरु झाली आहे….’ असं देखील वंदना शाह म्हणाल्या…

मोहिनी डे आणि रहमान के कनेक्शन

ए आर रेहमान आणि गिटारिस्ट मोहिनी यांच्या घटस्फोटाची बातमी एकाच दिवशी समोर आल्यामुळे चर्चांना उधाण आलं. शिवाय नको त्या चर्चांनी देखील जोर धरला. शाह म्हणाल्या, ‘गिटारिस्ट मोहिनी हिचं ए आर रेहमान घटस्फोट प्रकरणाशी काहीही संबंध नाही. सायरा आणि मिस्टर रेहमान यांनी दोघांनी स्वतः घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे…’ सध्या सर्वत्र ए आर रेहमान आणि सायरा बानू यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?