गर्दीत अडकल्याने घाबरली शुरा; पती अरबाज खानने केली अशी मदत, पहा Video

गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी अरबाज खानने शुराशी निकाह केली. बहीण अर्पिताच्या घरीच हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला होता. या निकाहला कुटुंबीय आणि मोजके पाहुणे उपस्थित होते. शुरा खान ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे.

गर्दीत अडकल्याने घाबरली शुरा; पती अरबाज खानने केली अशी मदत, पहा Video
Arbaaz Khan and his wife Shura Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 03, 2024 | 11:31 AM

सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक म्हणजे अरबाज खान आणि शुरा खान. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांनी निकाह केला. बहीण अर्पिताच्या घरी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. तेव्हापासून ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. डेट नाइट असो किंवा एखादा कार्यक्रम.. पापाराझींचं लक्ष या जोडीकडे वेधलंच जातं. आता नुकतीच ही जोडी मुंबईतल्या मोहम्मद अली रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये इफ्तार पार्टीसाठी आली होती. रमजानच्या महिन्यात मोहम्मद अली रोडवर खाण्याच्या विविध पदार्थांची चंगळ असते. अशातच ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या टीमसोबत अरबाज आणि शुरा इफ्तार पार्टीसाठी गेले होते.

रवीना टंडन, ताहीर शब्बीर, रिद्धिमा पंडित यांसारख्या कलाकारांसोबत अरबाज आणि शुरा हे मोहम्मद अली रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये इफ्तार पार्टीसाठी गेले होते. अरबाज आणि शुराने यावेळी एकत्र रोजा सोडला. यावेळी दोघं एकमेकांची खूप काळजी घेताना दिसले. सोशल मीडियावर या दोघांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अरबाज त्याच्या पत्नीला गर्दीतून सांभाळून पुढे घेऊन जात आहे. मोहम्मद अली रोडवर येताच अरबाज आणि शुराला पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. या गर्दीला पाहून शुरा खूप घाबरल्याचं तिच्या चेहऱ्यावरून समजतंय. तर तिच्या मागे असलेला अरबाज तिला गर्दीपासून वाचवत सुरक्षितरित्या पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय.

पहा व्हिडीओ

अरबाजची दुसरी पत्नी शुरा खान ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिचा इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असून तिचे 13 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. शुराने अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलंय. अरबाज आणि शुराची पहिली भेट ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. अरबाजने शुराशी दुसरं लग्न केलंय. याआधी त्याने अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही अरबाज आणि मलायका अनेकदा मुलासाठी एकत्र आल्याचं पहायला मिळालं.

अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहानने नुकताच स्वत: एक पॉडकास्ट कार्यक्रम लाँच केला आहे. या लाँचच्या आधी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत अरबाजची पूर्व पत्नी मलायका आणि दुसरी पत्नी शुरा सहभागी झाल्या होत्या.