AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drugs Case | अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयातून बाहेर, तब्बल 6 तास चौकशी!

अर्जुन रामपालची एनसीबी (NCB) चौकशी संपली. सुमारे सहा तास एनसीबीने अर्जुन रामपालची चौकशी केली आहे.

Drugs Case | अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयातून बाहेर, तब्बल 6 तास चौकशी!
| Updated on: Dec 21, 2020 | 6:45 PM
Share

मुंबई : अर्जुन रामपालची एनसीबी (NCB) चौकशी संपली. सुमारे सहा तास एनसीबीने अर्जुन रामपालची चौकशी केली आहे. आज त्याला अटक होईल अशी चर्चा सर्वत्र होती, मात्र आजचा दिवस अर्जुनसाठी लक्की ठरला. एनसीबीने यापूर्वी त्याला 16 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते, परंतु अर्जुनने 22 डिसेंबरला वेळ मागितली होती. पण आज अचानक अर्जुन चौकशीसाठी आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. (Arjun Rampal was interrogated by NCB for 6 hours)

अर्जुन रामपाल बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्यांचे नाव या अगोदर कधीच वादात आले नव्हते. या प्रकरणी 22 डिसेंबर रोजी अर्जुनला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, परंतु त्याला एनसीबीने आज म्हणजे 21 डिसेंबर रोजी समन्स बजावले. अर्जुन रामपालची 16 नोव्हेंबर रोजी प्रथम चौकशी केली गेली. त्यानंतर त्यांची काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे एनसीबीने जप्त केली आणि फॉरेन्सिक्ससाठी पाठविले होते.

अर्जुन रामपालच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून तपास यंत्रणेला काही नवीन पुरावे मिळाल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या वृत्तांतून समोर आली आहे. तसेच असे म्हटले होते की हे पुरावे आहेत, ज्यामुळे अर्जुन रामपालची अटक होऊ शकते. ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक नामवंतांची नावे समोर आली असली तरी अर्जुन रामपालचे नाव या प्रकरणात कसे समोर आले हे आम्ही आज सांगत आहोत.

नेमके प्रकरण कुठून सुरू झाले पहा 1. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर हे प्रकरण सुरू झाले. सुशांतच्या मृत्यूचा तपास सुरू झाला तेव्हा त्यात ड्रग्स अँगल समोर आला. ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने सर्व सुत्र हाती घेतले. एनसीबीने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी केली, त्यानंतर एकामागून एक अनेक खुलासे झाले. अनेक ड्रग पेडलर्स पकडले गेले.

2. त्याच्या तपासणीदरम्यान एनसीबीने नायजेरियन तरूणाला अटक केली. ओमेगा गोडविन असे याचे नाव होते. ओमेगाला एनसीबीने ड्रग्ससह अटक केली होती. पुढे चौकशी करत असताना अगिसियालोस डेमेट्रियड्सचे नाव ड्रग्जच्या प्रकरणात जोडले गेले.

3.अगिसियालोस अर्जुन रामपालची मैत्रीण गॅब्रिएलाचा भाऊ आहे. अगिसियालोस लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये वाढदिवसाच्या प्रोग्राममध्ये असताना त्याला अटक करण्यात आली होती. एनसीबीने अगिसियालोसकडून चरस व अल्प्रझोलमच्या काही गोळ्या जप्त केल्या आहेत.

4.एनसीबीने असा दावा केला होता की, अगिसियालोस ड्रग पेडलर्सशी संपर्क साधला होता. त्यांनी रिया चक्रवर्ती, शौविक, दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांनी सुशांतसिंग राजपूत यांच्यासाठी ड्रग्स विकत घेतल्याचा आरोप केला होता.

5.अगिसियालोसच्या अटकेनंतर एनसीबीने अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकला. छापेमारी दरम्यान तपास अधिका्यांना अर्जुनच्या घरातून अशी काही ड्रग्ज सापडली, ज्यांची बंदी आहे आणि ती एनडीपीएस कायद्यांतर्गत आहेत. यानंतर अर्जुन रामपाल आणि त्याची प्रेमिका गॅब्रिएला यांना चौकशीचे समन्स पाठविण्यात आले.

6.16 नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपालवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी बऱ्याच तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान अर्जुनने आपल्या घरातील प्रिस्क्रिप्शनची औषधे अधिकाऱ्यांना दिली होती. एनसीबीने दावा केला आहे की त्यांना हे प्रिस्क्रिप्शन खोटे आहे तसेच, अर्जुन रामपालने 16 नोव्हेंबर रोजी दिलेल्या माहितीत तफावत दिसत आहे.

संबंधित बातम्या :

Drugs Case | चौकशीची दुसरी फेरी, गॅब्रिएला पुन्हा एनसीबी कार्यालयात दाखल!

Drugs Case | 7 तासांच्या चौकशीनंतर अर्जुन रामपालची सुटका, या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याची प्रतिक्रिया!

(Arjun Rampal was interrogated by NCB for 6 hours)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...