AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या अभिनेत्रीला प्रेमात मिळाला धोका, तरीही तिने त्यालाच बनवले जीवनसाथी, बनली दुसरी बायको, 500 चित्रपटांमध्ये केलंय काम

बॉलिवूडमधील या अभिनेत्रीला प्रेमात मिळाला धोका, तरी देखील तिने त्यालाच बनवले जीवनसाथी, बनली दुसरी पत्नी. कोण आहे ही अभिनेत्री?

या अभिनेत्रीला प्रेमात मिळाला धोका, तरीही तिने त्यालाच बनवले जीवनसाथी, बनली दुसरी बायको, 500 चित्रपटांमध्ये केलंय काम
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 05, 2026 | 10:38 AM
Share

Aruna Irani love Story : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी आपल्या अभिनयाने अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आई, बहीण, मुलगी, वहिनी अशा विविध भूमिका साकारत त्यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून मोठी ओळख निर्माण केली. हिंदीसोबतच त्यांनी कन्नड, मराठी आणि गुजराती चित्रपटांमध्येही काम केलं आहे. पुढे त्यांनी टीव्ही मालिकांमधूनही आपली छाप सोडली.

अलीकडेच Indian Idol या लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये त्यांच्या उपस्थितीने चाहत्यांना सुखद धक्का दिला. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक अनोळखी पैलूंवर भाष्य केलं आणि आपल्या प्रेमकहाणीबद्दलही खुलासा केला.

कार्यक्रमादरम्यान होस्ट आदित्य नारायण यांनी ‘सुहाग’ या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘गोरे-गोरे मुखड़े पे काला-काला चश्मा’ याचा उल्लेख केला. हे गाणं त्यांच्या वडिलांनी गायले असून या चित्रपटाचं दिग्दर्शन कुकू कोहली यांनी केलं होतं, जे अरुणा ईराणी यांचे पती आहेत.

मैत्रीचं रूपांतर प्रेमात

यावेळी अरुणा इराणी यांना कुकू कोहली यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी हलक्याफुलक्या अंदाजात रोमँटिक की डायरेक्टर? असा प्रश्न परत विचारून वातावरण हलकं केलं. पुढे त्यांनी सांगितलं की, सुरुवातीला त्यांचं आणि कुकू कोहली यांचं अजिबात पटत नव्हतं. दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे आणि त्यांचा छत्तीसचा आकडा होता.

एका शूटिंगदरम्यान त्या आणि सुरेश भट मजेत कुकू कोहली यांच्याबद्दल बोलत होते. तेवढ्यात कुकू तिथे आले आणि काय चर्चा सुरू आहे असं विचारलं. त्यावर सुरेश भट्ट यांनी गंमतीत सांगितलं की अरुणा त्यांच्या स्तुती करत आहेत. यानंतर हळूहळू दोघांमधील वातावरण बदललं. कुकू यांचा स्वभाव मवाळ झाला आणि अरुणा त्यांच्याजवळ येऊ लागल्या. नकळत मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम

अरुणा इराणी यांनी 1990 मध्ये कुकू कोहली यांच्याशी विवाह केला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

मात्र, त्यांच्या प्रेमकहाणीला एक वेगळं वळणही होतं. अरुणा यांनी सांगितलं की, जेव्हा त्या कुकू कोहली यांच्या प्रेमात पडल्या, तेव्हा त्यांना हे माहिती नव्हतं की ते आधीपासून विवाहित आहेत. ही गोष्ट कळेपर्यंत त्या त्यांच्यावर मनापासून प्रेम करू लागल्या होत्या. कुकू कोहली यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगीही होती.

Follow Us
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...