AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

83 वर्षापूर्वी आशा भोसले यांनी गायलं होतं पहिलं गाणं, आजही ते गाणं प्रचंड चर्चेत

बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

83 वर्षापूर्वी आशा भोसले यांनी गायलं होतं पहिलं गाणं, आजही ते गाणं प्रचंड चर्चेत
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 12, 2026 | 1:18 PM
Share

Asha Bhosle : भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीतविश्वात आशा भोसले यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. गेल्या तब्बल आठ दशकांपासून त्या संगीतसेवेत कार्यरत असून त्यांनी आपल्या मोठी बहिण लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच प्रचंड लोकप्रियता आणि यश मिळवले आहे.

अलीकडेच आशा भोसले यांना प्रकृती खराब असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांनी आज वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

8 दशकांची भव्य कारकीर्द

आशा भोसले यांची कारकीर्द 80 वर्षांहून अधिक काळाची आहे. या काळात त्यांनी 12000 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली असून हा एक विक्रम मानला जातो. त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्येही झाली होती.

आशा भोसले यांनी अवघ्या 10 व्या वर्षी गायनाची सुरुवात केली. त्यांचे पहिले गाणे 1943 साली आलेल्या मराठी चित्रपट ‘माझा बाळ’साठी होते. “चला चला नव बाला” असे त्या गाण्याचे बोल होते. या चित्रपटात लता मंगेशकर यांनी गायिका नाही तर अभिनेत्री म्हणूनही काम केले होते.

बॉलिवूडमध्ये प्रवेश

हिंदी चित्रपटसृष्टीत आशा भोसले यांनी 1948 साली चुनरिया या चित्रपटातून प्रवेश केला. “सावन आया” हे त्यांचे पहिले हिंदी गाणे होते. त्यानंतर 1949 मधील रात की रानी या चित्रपटातून त्यांनी पहिले सोलो गाणे गायले. 1953 साली आलेल्या परिणीता या चित्रपटातील गाण्यांनंतर त्यांना खरी ओळख मिळू लागली आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

विशेष म्हणजे 92 व्या वर्षीही आशा भोसले संगीत क्षेत्रात सक्रिय होत्या. 91 व्या वर्षी त्यांनी “सैंया बिना” हे गाणे रेकॉर्ड केले होते, ज्यात त्यांच्या नात जनाई भोसलेही सहभागी होती. या गाण्याला यूट्यूबवर 1.5 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

प्रेरणादायी वारसा

आशा भोसले यांचा संगीतप्रवास हा संघर्ष, मेहनत आणि प्रतिभेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संगीतविश्वात अढळ स्थान निर्माण केले असून त्यांची परंपरा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा