Ashok Saraf: मुलाचं आणि बापाचं नातं चांगलं असेलच असं…., अशोक सराफ स्पष्टच म्हणाले
Ashok Saraf: मराठी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आजही सिनेविश्वात सक्रिय आहे. आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी मुलगा, वडील आणि आजोबांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे...

Ashok Saraf: ‘मुलाचं नातं बापाचं नातं चांगलं असेलच असं नाही, पण आजोबांसोबत त्याचं नातं चांगलंच असतं…’, असं वक्तव्य अभिनेते अशोक सराफ यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सांगतिलं आहे. सांगायचं झालं तर अशोक सराफ यांचा ‘आदि अनंत’ सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे, सिनेमा आजोबा आणि नातवाच्या नात्या भोवती फिरताना दिसणार आहे. सिनेमात अशोक सराफ आजोबांच्या भूमिकेत झळकणार आहेत, तर अभिनेका संकर्षण कऱ्हाडे नातवाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. अशात नुकताच झालेल्या मुलाखतीत सराफ यांनी नात्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
आजोबा आणि नातवाच्या नात्याबद्दल अशोक सराफ म्हणाले, ‘मुलाचं आणि बापाचं नातं चांगलं असेल असं सांगता येत नाही. पण लहान मुलाचं आणि आजोबांचं नातं हे चांगलंच असतं… आजोबा आणि नातवाचं नातं म्हणजे दुधावरची साय… मुलाने केलेल्या आजोबांच्या दृष्टीने माफ असतात. ते एकवेळ मुलाला ओरडतील पण नातवाची बाजू घेतील. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर, मला आजोबांचा सहवास कधीच मिळाला नाही.
पुढे अशोक सराफ म्हणाले, ‘मी जन्माला यायच्या आधीच माझे आजोबांचं निधन झालं होतं. त्यामुळे आजोबांसोबत नातं कसं असतं, याचा मला अनुभव आलाच नाही. पण मी पाहिलेलं आणि अनुभवलेलं आहे… वाचलेलं आहे…. त्यामुळे ही नाती घट्ट कशी असतात याची मला कल्पना आहे. याच आधारावर मी डेव्हलप करत गेलो. याने जे लिहिलं होतं, त्यामध्ये मी फक्त रंग भरत गेलो.’, असं देखील अशोक सराफ म्हणाले.
सध्या सर्वत्र ‘आदि अनंत’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमाचं दिग्दर्शत महेश लिमये यांनी केलं असून, अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यासोबत सिनेमात सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड. आरव अहीर, श्रीरंग गोडबोले, अनिकेत मराठे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सिनेता अशोक सराफ यांना आजोबांच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत, तर ट्रेरल प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत.