मोंदींसमोर गेले अन्…राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री स्वीकारण्याआधी अशोक सराफांच्या त्या कृतीने सर्वांची मनं जिंकली

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्यसम्राट अभिनेते अशोक सराफ यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पण पुरस्कार स्वीकारण्याआधी अशोक सराफ यांच्या एका कृतीने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत.

मोंदींसमोर गेले अन्...राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री स्वीकारण्याआधी अशोक सराफांच्या त्या कृतीने सर्वांची मनं जिंकली
Ashok saraf
Image Credit source: instagram
| Updated on: May 28, 2025 | 1:30 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी,27 मे रोजी पद्म पुरस्कार 2025 च्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्यांचा सन्मान केला. कला, सामाजिक कार्य आणि संगीत क्षेत्रातील योगदानासाठी 68 प्रतिष्ठित व्यक्तींना पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यात सन्मानित करण्यात आलं. यामध्ये प्रसिद्ध दिवंगत गायिका शारदा सिन्हा, अशोक सराफ, रिकी ग्यान यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे आहेत.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री अमित शहा, एस. जयशंकर, प्रल्हाद जोशी, जितेंद्र सिंह, जी. किशन रेड्डी आणि इतर अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. पद्म पुरस्कार हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहे. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो.

अभिनेते अशोक सराफ यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आलं

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्यसम्राट अभिनेते अशोक सराफ यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आलं ही खरोखरच सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे चित्र पाहून नक्कीच सर्वच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत. पोस्टमध्ये ते म्हणाले की “पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या”, असं म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.


अशोक सराफांच्या एका कृतीने सर्वांची मनं जिंकून घेतली

दरम्यान पुरस्कार स्वीकारण्याआधी अशोक सराफ यांच्या एका कृतीने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. पुरस्कार स्वीकारण्याआधी अशोक सराफ पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सभागृहातील उपस्थितांचे हात जोडून अभिवादन केले. त्यांच्या या कृतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. जेव्हा त्यांना पद्मश्रीने गौरवण्यात आलं, जेव्हा त्यांच्या हातात तो पुरस्कार देण्यात आला तेव्हा उपस्थित असलेल्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक आंनदित हास्य होत. सर्वांनी मनापासून त्यांचे अभिनंदन केल्याचं दिसून आलं.

‘मी माझ्या आयुष्यात खरोखर काहीतरी केले आहे…’

पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अशोक सराफ यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. ते म्हाणाले की, ‘ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हा सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा पुरस्कार हा एक मोठा सन्मान आहे. या पुरस्कारासाठी माझे नाव विचारात घेण्यात आले याचा मला आनंद आहे, याचा अर्थ मी माझ्या आयुष्यात खरोखर काहीतरी केले आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.” असं म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले.


अशोक सराफांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर….

अशोक सराफ यांना सर्वजण प्रेमाने ‘मामा’अशी हाक मारतात. अशोक मामांचा जन्म 1947 साली मुंबईतच झाला. 1969 पासून ते सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. मराठीसोबतच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. ‘जानकी’ या सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. मराठीप्रमाणेच त्यांनी हिंदी सिनेमांमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे.