AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बधाई दो’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ट्रेलरमधील कॉमेडी लोकांच्या पसंतीला

राजकुमारच्या चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हा या चित्रपटाबाबत बरीच चर्चा झाली होती. म्हणूनच, परंतु बर्याच काळापासून त्याच्याशी संबंधित कोणतेही अपडेट नव्हते. गेल्यावेळी त्याची रिलीज डेट २६ जानेवारी होती, पण कोविडमुळे त्याची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलण्यात आली होती.

'बधाई दो' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ट्रेलरमधील कॉमेडी लोकांच्या पसंतीला
राजकुमार रावआणि भूमी पेडणेकर
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 12:25 PM
Share

मुंबई – राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्या ‘बधाई दो’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज आजचं झाला आहे. या चित्रपटात कॉमेडीची (comedy) पूर्णपणे पाहायला मिळणार आहे. राजकुमार राव आणि भूमी हे एकत्र प्रेक्षकांना खूप हसवणार असल्याचं ट्रेलर (Trailer) मधून पाहावयास मिळत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटात काही वेगळे विषय आल्याचं सुध्दा समजतंय. काल या चित्रपटाचे पोस्टर रिलीज (poster release) करण्यात आले होते. पोस्टर रिलीज होताचं ते अनेकांच्या पसंतीला पडल्याचे पाहायला मिळतं आहे. ‘बधाई दो’ हा चित्रपट फक्त चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित होणार असल्याचेही या पोस्टरसोबत सांगण्यात आले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये राजकुमार राव पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भूमी एका मुलीच्या भूमिकेत आहे जिला मुलांमध्ये रस नाही आणि नंतर ती एका मुलाशी लग्न करते असं ट्रेलरमध्ये पाहावयास मिळतं आहे.

चित्रपटाचं ट्रेलर इथे पाहा

View this post on Instagram

A post shared by Bhumi ? (@bhumipednekar)

या चित्रपटात राजकुमार एका नव्या लूकमध्ये दिसणार असून तो आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल असं आपल्याला ट्रेलरमध्ये पाहावयास मिळत आहेत. राजकुमारच्या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा या चित्रपटाबाबत बरीच चर्चा झाली होती. पण, चित्रपटाबाबत मागील काही काळापासून त्याच्याशी संबंधित कोणतेही अपडेट नव्हते. मागच्यावेळी चित्रपटाची रिलीज डेट 26 जानेवारी ठेवण्यात आली होती. पण कोविडमुळे त्याची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलण्यात आली होती. आता ट्रेलरसोबत त्याची रिलीज डेटही सांगण्यात आली आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

या कारणामुळे चित्रपट रिलीज पुढे ढकलला

राजकुमारच्या चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हा या चित्रपटाबाबत बरीच चर्चा झाली होती. म्हणूनच, परंतु बर्याच काळापासून त्याच्याशी संबंधित कोणतेही अपडेट नव्हते. गेल्यावेळी त्याची रिलीज डेट २६ जानेवारी होती, पण कोविडमुळे त्याची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलण्यात आली होती. आता त्याची नवीन रिलीज डेट जाहीर केली जाईल. तेव्हा त्याच्या प्रदर्शनाबाबतही तारिख निश्चित होण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन कुलकर्णी या चित्रपटाचे दिग्दर्शक असून विनीत जैन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून राजकुमारने लिहिले आहे की, आमच्या ट्रेलर कॉलसाठी शुभेच्छा देऊन तुम्ही अभिनंदन करू शकता.

विराटने अनुष्काशी लग्न करायला नको होतं म्हणताच चाहत्यांनी शोएबला घेरले; म्हणाले…

सलमान फार्म हाऊस म्हणजे गुन्हेगारीचा अड्डा?, कलाकारांचे मृतदेह, लहान मुलांची तस्करी, भाईजानविरूद्ध आरोपांची राळ!

सरोगसीबाबतचं ‘ते’ विधान प्रियांका चोप्रा आणि निक जोनसबद्दल नव्हतं, चौफेर टीकेनंतर लेखिका तसलीमा नसरीन यांचं स्पष्टीकरण

Follow Us
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.