सरोगसीबाबतचं ‘ते’ विधान प्रियांका चोप्रा आणि निक जोनसबद्दल नव्हतं, चौफेर टीकेनंतर लेखिका तसलीमा नसरीन यांचं स्पष्टीकरण

सरोगसीबाबतचं 'ते' विधान प्रियांका चोप्रा आणि निक जोनसबद्दल नव्हतं, चौफेर टीकेनंतर लेखिका तसलीमा नसरीन यांचं स्पष्टीकरण
प्रियांका चोप्रा, निक जोनस, तसलीमा नसरीन

तसलिमा यांचं विधान प्रियांका आणि निक यांच्याशी जोडलं गेलं. त्यावर तसलिमा नसरीन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'ते' विधान प्रियांका आणि निक जोनस यांच्या संदर्भातलं नाही', असं तसलिमा म्हणाल्या आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 25, 2022 | 12:13 PM

मुंबई : लेखिका तसलिमा नसरीन (Writer Taslima Nasrin) यांच्या एक विधानामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली. सरोगसीच्या माध्यमातून पालक होणाऱ्यांना त्यांनी ‘यांना आयती मुलं पाहिजेत’, असं विधान केलं. त्यावरून मोठा वाद झाला. अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनस (Nick Jonas) यांनी नुकतंच सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला. त्यामुळे तसलिमा यांचं विधान प्रियांका आणि निक यांच्याशी जोडलं गेलं. त्यावर तसलिमा नसरीन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘ते’ विधान प्रियांका आणि निक जोनस यांच्या संदर्भातलं नाही’, असं तसलिमा म्हणाल्या आहेत.

तसलिमा नसरिन यांचं स्पष्टीकरण

मी सरोगसीबाबत जे बोलले ते माझ्या स्वत: च्या अनुभवातून आणि माझ्या विचार स्वातंत्र्यातून बोलले. त्याचा प्रियांका आणि निक यांच्या पालक होण्याशी काहीही संबंध नाही. मला हे कपल आवडतं. मी त्यांच्या आई-बाबा होण्याने खुश आहे, असं स्पष्टीकरण तसलिमा यांनी दिलं आहे.

तसलिमा नसरीन यांचं ‘ते’ वादग्रस्त विधान

ज्या महिला सरोगसीच्या माध्यमातून आई बनत आहेत, त्यांना आईपणाची अनुभुती कशी येणार? मुलाला जन्म देताना जशी एखाद्या आईची भावना असते तशी भावना त्यांनाही सरोगसीच्या माध्यमातून आई होत असताना येत असेल का?, असं तसलिमा नसरीन म्हणाल्या होत्या. ‘श्रीमंत लोक नेहमी गरीब लोकांचा फायदा उचलतात. श्रीमंत लोकांना गरीब महिला असल्यामुळेच सरोगसी शक्य आहे. जर तुम्हाला एखादं मूल वाढवायचं असेल तर दत्तक घ्या. आपले संस्कार वंशाच्या मुलांनाच मिळायला हवेत हा अत्यंत स्वार्थी विचार असल्याचं तसलिमा म्हणाल्या होत्या.

तस्लिमा यांनी आणखी एक ट्वीट केलं. ज्यात त्या म्हणाल्या, ‘जोपर्यंत श्रीमंत महिला सरोगेट मदर बनत नाहीत, तोपर्यंत मी सरोगसी स्वीकारणार नाही. जोपर्यंत पुरुष देहविक्रीचा व्यवसाय करत नाहीत आणि पुरुष महिला ग्राहकांची वाट बघत थांबणार नाहीत, तोपर्यंत मी वेश्या व्यवसाय स्वीकारणार नाही. जोवर पुरुष बुरखा घालत नाही, तोपर्यंत मी बुरखा स्वीकारणार नाही. अन्यथा सरोगसी, देहविक्री आणि बुरख्याच्या माध्यमातून फक्त गरीबांचे आणि महिलांचे शोषण होत राहील, असं तसलिमा म्हणाल्या होत्या. त्यावरून वाद झाला. आता आपण सरोगसीबद्दल जे बोललो ते प्रियांका आणि निकबद्दल नसल्याचं तसलिमा यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या

विराटने अनुष्काशी लग्न करायला नको होतं म्हणताच चाहत्यांनी शोएबला घेरले; म्हणाले…

सलमान फार्म हाऊस म्हणजे गुन्हेगारीचा अड्डा?, कलाकारांचे मृतदेह, लहान मुलांची तस्करी, भाईजानविरूद्ध आरोपांची राळ!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें