AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराटने अनुष्काशी लग्न करायला नको होतं म्हणताच चाहत्यांनी शोएबला घेरले; म्हणाले…

पाकिस्थानचे माजी खेळाडू शोएब अख्तर आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी प्रसिध्द असतो. त्यातचं त्याचा सोशल मीडियावर समाचार घेणारे सुध्दा सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतात.

विराटने अनुष्काशी लग्न करायला नको होतं म्हणताच चाहत्यांनी शोएबला घेरले; म्हणाले...
फोटो - सोशल मीडिया
| Edited By: महेश घोलप | Updated on: Jan 25, 2022 | 11:41 AM
Share

मुंबई – मागच्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावरती अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या मुलगी वामिकाची खूप चर्चा सुरू आहे. काही फोटो सोशल मीडियावरती (social media) प्रचंड व्हायरल झाले झाले आहेत. विराट कोहलीच्या देशभरातील चाहत्यांनी त्यावर कमेंट केली आहे. त्यामध्ये विराट कोहली यांनी कर्णधारपद सोडल्याची सुध्दा चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये पाकिस्थानचे माजी खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सुध्दा सामील आहे. शोएब अख्तरने विराट आणि अनुष्का यांच्या लग्नावर एक टिपणी केली आहे, त्यामध्ये तो म्हणतो की विराट अनुष्काशी लग्न करायला नको होते. त्यानंतर दोघांच्या चाहत्यांनी अख्तरला घेरले आणि जाब विचारला.

अशी केली होती टिप्पणी

पाकिस्थानचे माजी खेळाडू शोएब अख्तर आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी प्रसिध्द असतो. त्यातचं त्याचा सोशल मीडियावर समाचार घेणारे सुध्दा सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतात. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने एएनआयशी बोलताना सांगितले की, जर मी भारतात असतो आणि वेगवान गोलंदाज असतो. तर मी लग्न केले नसते. मी माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले असते, हा माझा विचार आहे. हा कोहलीचा वैयक्तिक निर्णय आहे. तुम्ही मला विचाराल तर मी माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करेन. गेल्या वर्षी कोहलीने आपल्या आयुष्यातील शेवटचा निर्णय घेतला, त्याने टी-20 चे कर्णधारपद सोडले, त्यानंतर त्याला वनडेचे कर्णधारपदही गमवावे लागले. आता त्याने कसोटी सामन्याचे कर्णधारपदही सोडले आहे. या निर्णयावर प्रत्येकाचे मत वेगळे आहे, मात्र विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांना शोएबचे मत पसंत पडलेले नाही.

या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका

एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले आहे की, “त्याच्या मते करिअर हे सर्व काही असेल तर, प्रेम जीवन, कुटुंब, आनंद तुम्हाला याचा काहीचं फरक पडत नाही. मला वाटते अशा लोकांनी तोंड बंद ठेवावे.” जिमी नावाच्या युजरने विराटचा रिलेशनशिपनंतरचा रेकॉर्ड समोर ठेवला आणि म्हणाला की, विराटचे करिअर शिखरावर होते, तेव्हा तो अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये होता. शोएबच्या या वक्तव्यासाठी सोशल मीडियावर जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.

दोनच दिवसांपूर्वी वामिकाचा फोटो व्हायरल झाला होता. यावर अनुष्काने आपल्या मुलीचा फोटो व्हायरल होऊ नये, अशी प्रतिक्रिया दिली होती. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये अनुष्का आणि वामिकाला कॅमेऱ्याने कैद केले होते.

Pooja Sawant Birthday : हॅप्पी बर्थ डे कलरफुल!, वाढदिवसानिमित्त पूजा सावंतचे ‘रंगीन’ फोटो आणि लक्षवेधी माहिती

8 व्या वर्षी पहिले पारितोषिक, त्यानंतर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; असं घडलं कविता कृष्णमूर्ती यांचं करिअर

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, टीमकडून पुन्हा प्रार्थनेची विनंती!

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!