हिंदी भाषिक भागात दाक्षिणात्य चित्रपटांचा वाढला प्रभाव, निर्मात्यांचा रिमेक बनवण्याचा प्लॅन, ‘पुष्पा’च्या हिंदी डबची कोटीची कमाई

हिंदी भाषिक भागात दाक्षिणात्य चित्रपटांचा वाढला प्रभाव, निर्मात्यांचा रिमेक बनवण्याचा प्लॅन, 'पुष्पा'च्या हिंदी डबची कोटीची कमाई
पानमसाल्याच्या जाहिरातीसाठी ‘स्टार्स अभिनेत्यां’मध्येही लागते स्पर्धा
Image Credit source: TV9

चित्रपटाचे निर्माते मनीष शाह यांनी पहिल्यांदा अजय देवगण यांच्याशी संपर्क केला होता. परंतु अजय देवगणने तात्काळ या गोष्टीला नकार दिला होता. त्याच्यानंतर त्याचं रोलसाठी शाह यांनी अक्षयकुमार यांना संपर्क साधला होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 25, 2022 | 10:52 AM

मुंबई – हिंदी भाषा बोलली जात असलेल्या भागात दाक्षिणात्य चित्रपटांना अधिक पसंती मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक दाक्षिणात्य निर्माते त्यांच्या चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याचं ‘पुष्पा’च्या हिंदी डबने मोठी कमाई केली आहे, ज्यामुळे अनेक निर्मात्यांना हा एक फायदेशीर करार वाटू लागला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माता मनीष शाह (manish shah) यांनी अजय देवगण (ajay devgn)आणि अक्षय कुमार (akshay kumar) यांच्याशी ‘विश्वसम’ (vishvsam) या सुपरहिट चित्रपटासाठी चर्चा केली होती, परंतु दोघांनीही यात काम करण्यास नकार दिला आहे. या चित्रपटाच्या रिमेकचे मूळ हक्क मनीष शाह यांच्याकडे आहेत, मात्र या दोन बड्या बॉलिवूड स्टार्सनी नकार दिल्यानंतर त्यांच्या सुरुवातीच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.

अजय देवगण, अक्षय कुमारची मागार

चित्रपटाचे निर्माते मनीष शाह यांनी पहिल्यांदा अजय देवगण यांच्याशी संपर्क केला होता. परंतु अजय देवगणने तात्काळ या गोष्टीला नकार दिला होता. त्याच्यानंतर त्याचं रोलसाठी शाह यांनी अक्षयकुमार यांना संपर्क साधला होता. पण अक्षयकुमारने सुध्दा नकार दिल्याचं समजतंय. त्यामुळे मनिष शाह यांची ‘विश्वसम’ फिल्म बनेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दोघांनी चित्रपट का नाकारला यांचं कारण नुकतंचं समोर आलंय, त्या चित्रपटाची भाषा हिंदी भाषिकांच्या लक्षात येणार नाही.

एकता कपूरने प्रोड्युसरची ऑफर नाकारली

मनीष शाह यांनी ‘विश्वसम’ हा चित्रपट बनवण्यासाठी आणि प्रोड्युस करण्यासाठी एकता कपूर यांची भेट घेतली होती. पण तिथेही त्यांना नकार मिळाला. यानंतर मनीषने सांगितले की, मूळ चित्रपटात एकत्र काम केलेल्या सत्य ज्योती फिल्म्ससोबत या चित्रपटाचा रिमेक बनवणार आहे. या चित्रपटाचा रिमेक सुमारे 4 कोटींना विकला गेला आहे.

मूळ चित्रपटात अजित कुमार मुख्य भूमिकेत होता

‘विश्वसम’मध्ये अजित कुमार मुख्य भूमिकेत दिसले होते. त्याच्याशिवाय नयनतारा, जगपती बाबू आणि विवेक यांनीही या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाने केले होते. अक्षय आणि अजय त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत जिथे अक्षयचे ‘पृथ्वीराज’ आणि ‘बच्चन पांडे’ रिलीजसाठी सज्ज आहेत. दुसरीकडे, अजय देवगणचा ‘रन वे’ लवकरच थिएटरमध्ये येणार आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत.

Pooja Sawant Birthday : हॅप्पी बर्थ डे कलरफुल!, वाढदिवसानिमित्त पूजा सावंतचे ‘रंगीन’ फोटो आणि लक्षवेधी माहिती

8 व्या वर्षी पहिले पारितोषिक, त्यानंतर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; असं घडलं कविता कृष्णमूर्ती यांचं करिअर

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, टीमकडून पुन्हा प्रार्थनेची विनंती!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें