Bahirji Marathi Movie : स्वराज्याचा तिसरा डोळा उघडला तर तांडवच होणार… ‘बहिर्जी’ स्वराज्याच्या गुप्तहेराची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर! हा कलाकार साकारणार….
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गुप्तहेर बहिर्जी नाईकांची कथा मोठ्या पडद्यावर येणार आहे. युवराज पाटील यांचं लेखन आणि राहुल जाधव यांचं दिग्दर्शन केलं असून पहिले मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. तर हा कलाकार साकारणार....

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे बहिर्जी नाईक यांची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अंश मीडिया वर्क्स निर्मित आगामी ऐतिहासिक चित्रपट बहिर्जी चं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. शत्रूच्या गोटात प्रवेश करून त्यांची रणनीती जाणून घेणारे आणि आपल्या बुद्धीचातुर्याने स्वराज्याच्या मोहिमांना यश मिळवून देणारे बहिर्जी नाईक यांचं कार्य, स्वराज्य निष्ठा, धाडसं या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये एकमागोमाग एक ऐतिहासिक व्यक्तिरेखेंचे चेहरे दिसतात. त्यांच्या चेहऱ्यांवरील गंभीर भाव आणि भारदस्त लूक चित्रपटांविषयी आणि कलाकारांविषयीची उत्सुकता अधिकच वाढत आहे. मात्र या नेमक्या या कोणत्या व्यक्तिरेखा आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राहूल जाधवं यांनी सोशल मीडियावर सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. स्वराज्याचा तिसरा डोळा उघडला तर तांडवच होणार.. होशियार ssss आता घराघरात बहिर्जी येणार.. कसा.. कधी.. कुठून..??? अवो ते गुपित त्याच्यापाशीच हाय.. नजर ठेवून रहा फक्त.. असे कॅप्शनही पोस्टला दिले आहे.
या चित्रपटाचं लेखन युवराज पाटील यांनी केलं असून राहूल जाधव दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहेत. चित्रपटाविषयी बोलताना राहूल बोलताना राहूल जाधव यांनी सांगितलं की बहिर्जी नाईक यांचं व्यक्तिमत्व जितकं विलक्षण आहे. तितकंच त्याचं कार्य रहस्यमय आहे. या चित्रपटासाठी आम्ही ऐतिहासिक संदर्भांचा सखोल अभ्यास केला, संशोधन केलं आणि त्या काळातील वातावरणं, मोहिमा व व्यक्तिरेखांच विश्व उभं करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. हा केवळ गुप्तहेराचा प्रवास नाही, तर स्वराज्यासाठी सावलीसारखं काम करणाऱ्या असंख्या शूरवीरांच्या योगदानाचा आणि त्यांच्या निष्ठेचा प्रवास आहे. लवकरच प्रदर्शनाची तारीख प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. जिकर हाय तर फिक्कर नाय या निर्धाराने आम्ही बर्हिर्जींची ही गाथा मोठ्या पडद्यावर साकारत आहोत. दरम्यान चित्रपटातील कलाकरांची नावं, त्यांच्या भूमिका आणि प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे बहिर्जी च्या आगामी घोषणांकडे आणि या ऐतिहासिक चित्रपटाच्या पुढील प्रवासाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.