AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 20 : रीति तिवारीची ‘बिग बॉस 20’ मध्ये घरवापसी ? सलमानने हिंट देताच घरातल्यांचा चेहरा पाहण्यालायक

Bigg Boss 20 : सलमान खानच्या 'बिग बॉस 20' मध्ये यावेळेस आठवड्याच्या मध्यातच एव्हिक्शन झालं. तीन स्पर्धकांना पॉवर मिळाल्यावर, त्यांनी रीति तिवारीला घराबाहेर पाठवलं. मात्र ती पुन्हा शोमध्ये एंट्री करणार का ?

Bigg Boss 20 : रीति तिवारीची ‘बिग बॉस 20’ मध्ये घरवापसी ? सलमानने हिंट देताच घरातल्यांचा चेहरा पाहण्यालायक
| Updated on: Oct 03, 2026 | 2:56 PM
Share

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’ चं घर सध्या ड्रामा, रडारड आणि धक्कादायक ट्विस्ट्सनी भरलेलं आहे. मेकर्स दररोज असा काही डाव टाकतात, ज्यामुळे घरात आणि बाहेर दोन्हीकडे खळबळ माजते. नुकतंच या शोमध्ये आठवड्याच्या मध्यातच एव्हिक्शन झालं. उदिति सिंह, यंग डीएसए आणि माही विजला स्पेशल पॉवर मिळाल्यावर, त्यांनी चर्चा करून एकमताने मनोज तिवारी यांची मुलगी रीति तिवारीला घराबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला. तिला मध्येच जावं लागलं. रीति अचानक बेघर झाल्याने भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे खूपच इमोशनल झाली होती. मात्र आता शोचा एक नवा प्रोमो समोर आलाय. सलमान खान (Salman Khan) रीति तिवारीला पुन्हा घरात पाठवणार का ?

‘वीकेंड का वार’च्या नव्या प्रोमोमध्ये सलमान खान घरातील सदस्यांना चांगलाच धडा शिकवताना दिसतोय. रीती तिवारीला घरातून बाहेर करण्याच्या निर्णयावर सलमानने नाराजी व्यक्त केली. रीतीला घरातून काढण्यापूर्वी स्वतःला सिद्ध करण्याची किंवा आपली चूक सुधारण्याची एकही संधी दिली गेली नाही, असं त्याने स्पष्ट केलं.

सलमान खानच्या हिंटने गदारोळ

नव्या प्रोमोमध्ये सलमान खान म्हणताना दिसला, “ रीती घरातून निघून गेली. या लोकांनी तिला चढवलं. नंतर तिने माफीही मागितली. पण तुम्ही लोकांनी तिला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधीही दिली नाही की ती सुधारली आहे.” यानंतर सलमान खानने शोच्या यंदाच्या खास थीमकडे इशारा केला. तो म्हणाला, “ तुम्ही सगळे विचार करताय की रीती गेली, बिग बॉसला वाटतं की ती गेली… पण या सीझनची थीम काय आहे? – तथास्तु!” या वक्तव्यानंतर सलमानने रीती तिवारीला पुन्हा स्टेजवर बोलावलं. रीतीला पाहताच आम्रपाली दुबे आनंदाने उड्या मारताना आणि खळखळून हसताना दिसली. मात्र, घरातील इतर सदस्य मात्र रीतीला अचानक समोर पाहून चांगलेच थक्क झाले.

खरंच होणार रीतीची घरात पुन्हा एन्ट्री?

सलमान खानने दिलेली ही केवळ मजेशीर हिंट आहे की रीती तिवारी खरंच शोमध्ये परतणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तिच्या पुनरागमनाबाबत सध्या उत्सुकता कायम आहे. जर रीती तिवारीची खरंच पुन्हा घरात एन्ट्री झाली, तर उदिती, माहि आणि यंग डीएसएस यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. आता रीतीला पुन्हा घरात प्रवेश मिळतो का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Follow Us
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला