AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोरं जन्माला घालायची आणि घटस्फोट घ्यायचा द्यायचा यांच्यासाठी कॉमनच… भारती सिंह त्या विधानानंतर प्रचंड ट्रोल

कॉमेडी क्वीन भारती सिंह सध्या चांगलीच चर्चेत आहे. भारती पती हर्ष लिंबाचियाला घटस्फोट देत असल्याचे म्हटले जात आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच नाराजी व्यक्त केली आहे.

पोरं जन्माला घालायची आणि घटस्फोट घ्यायचा द्यायचा यांच्यासाठी कॉमनच... भारती सिंह त्या विधानानंतर प्रचंड ट्रोल
Harsh and bharti singhImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 20, 2026 | 12:15 PM
Share

कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंह सध्या तिच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत आली आहे. आपल्या जबरदस्त कॉमिक टाइमिंगने आणि मजेशीर शैलीने लोकांना हसवणाऱ्या भारतीचे एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खरं तर, गेल्या काही दिवसांपासून तिच्या आणि हर्ष लिम्बाचियाच्या नात्याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा समोर येत होत्या. दरम्यान, भारतीने तिच्या यूट्यूब व्लॉगमध्ये (Vlog) या बातम्यांवर उघडपणे भाष्य करत चाहत्यांना संपूर्ण सत्य सांगितले आहे. तिच्या या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

४१ वर्षांच्या भारतीने तिच्या नवीन व्लॉगमध्ये गमतीने म्हटले की, आता ती पती हर्ष लिम्बाचियासोबत राहू शकत नाही. कारण त्यांच्यात दुरावा येऊ लागला आहे आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडचिड होऊ लागली आहे. मात्र, भारतीने लगेचच स्पष्ट केले की हा फक्त एक विनोद होता. ती म्हणाली की सोशल मीडिया आणि अनेक पोर्टल्स तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून बातम्या दाखवतात. भारती सिंहने सांगितले की, तिच्या आणि हर्ष लिम्बाचियाच्या नात्यात कोणत्याही प्रकारची अडचण नाही आणि दोघेही आज पूर्वीप्रमाणेच आनंदी आयुष्य जगत आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

भारती सिंहच्या यूट्यूबवर चॅनेलवरील व्हिडीओचे काही रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने ‘नक्की चाललंय तरी काय…’ असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या एका यूजरने भारती नेहमी प्रमाणे कॉमेडी करत आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने इंडस्ट्रीमध्ये सतत घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. पण भारती आणि हर्ष वेगळे झाले तर आम्हाला दु:ख होईल असे म्हटले आहे. एका यूजरने तर, पोरं जन्माला घालायची आणि घटस्फोट घ्यायचा द्यायचा यांच्यासाठी कॉमनच असे स्पष्ट मत मांडले आहे. सध्या सोशल मीडियावर भारतीच्या घटस्फोटाची चांगलीच चर्चा सुरु आहे.

खोट्या बातम्यांवर व्यक्त केला राग

कॉमेडियन भारतीने खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत मजेशीर शैलीत आपली बाजू मांडली. ती म्हणाली, ‘तुम्ही लोक इतके विनोदी आहात की कधी कधी भारती सिंह आणि कपिल शर्माच्याही पुढे निघून जाल.’ भारतीने सांगितले कि लोक तिच्या व्लॉग मधील छोट्या छोट्या गोष्टी पकडून मोठ्या बातम्या बनवतात. नात्यात कटुता आल्याच्या बातम्यांवरही तिने मजेशीर प्रतिक्रिया दिली. भारती म्हणाली, ‘आमच्या घरात लिंबू चांगले येत नाहीयेत आणि लोक म्हणत आहेत की नात्यात कटुता आली आहे’. तिची ही मजेशीर स्टाईल चाहत्यांना खूप आवडत आहे.

२०१७ मध्ये झाले होते दोघांचे लग्न

भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया यांनी २०१७ मध्ये गोव्यात थाटामाटात लग्न केले होते. त्यांचे लग्न टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध लग्नांपैकी एक मानले जाते. लग्नानंतरही हे दोघे अनेक टीव्ही शो आणि व्लॉग्समध्ये एकत्र दिसले आहेत. चाहत्यांना त्यांची शानदार बाँडिंग, मजेशीर अंदाज आणि एकमेकांसोबतची मस्ती खूप आवडते. दोघेही सोशल मीडियावर अनेकदा विनोदी व्हिडीओ आणि सुंदर क्षण शेअर करत असतात. यामुळेच जेव्हा जेव्हा त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही बातमी समोर येते, तेव्हा ती लगेच लोकांचे लक्ष वेधून घेते.

Follow Us
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....