AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhooth Bangla: बॉक्स ऑफिसवर ‘भूत बंगला’ची दहशत; 5 दिवसांत कमावले इतके कोटी

अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला हा हॉरर कॉमेडी चित्रपट 17 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शनने बऱ्याच वर्षांनंतर एकत्र काम केलं आहे.

Bhooth Bangla: बॉक्स ऑफिसवर 'भूत बंगला'ची दहशत; 5 दिवसांत कमावले इतके कोटी
भूत बंगलाImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 22, 2026 | 2:27 PM
Share

गेल्या महिनाभरापासून बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर : द रिव्हेंज’चा बोलबाला पहायला मिळतोय. महिनाभरानंतर 17 एप्रिल रोजी अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘धुरंधर 2’च्या लाटेत हा चित्रपट चांगली कमाई करू शकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात होतं. परंतु प्रियदर्शन आणि अक्षयच्या जोडीने पुन्हा एकदा कमाल केली आहे. पेड प्रीव्ह्यूसह या चित्रपटाने 16 कोटी रुपयांनी बॉक्स ऑफिसवर ओपनिंग केली. आता प्रदर्शनाला पाच दिवस झाल्यानंतर चित्रपटाची कोट्यवधी रुपयांची कमाई सुरू आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शनने केलं आहे. या जोडीने याआधी ‘दे दना दन’, ‘खट्टा मीठा’, ‘गरम मसाला’, ‘भागम भाग’, ‘हेरा फेरी’, ‘भुल भुलैय्या’ यांसारख्या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं.

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ने पेड प्रीव्ह्यूद्वारे 3.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 12.25 कोटी रुपयांची कमाई झाली. रविवारपर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. मात्र सोमवारी कमाईत थोटी घट पहायला मिळाली. मंगळवारी या चित्रपटाचे एकूण 11,183 शोज होते, त्यातून 6.82 कोटी रुपयांची कमाई झाली. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाने भारतात 71.57 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हे नेट कलेक्शन असून भारतातील ग्रॉस कलेक्शनचा आकडा 85.38 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

भूत बंगलाची कमाई-

  • पेड प्रीव्ह्यू- 3.75 कोटी रुपये
  • पहिला दिवस- 12.25 कोटी रुपये
  • दुसरा दिवस- 19 कोटी रुपये
  • तिसरा दिवस- 23 कोटी रुपये
  • चौथा दिवस- 6.75 कोटी रुपये
  • पाचवा दिवस- 6.82 कोटी रुपये (आतापर्यंत)
  • एकूण नेट इंडिया कलेक्शन- 71.57 कोटी रुपये

‘भूत बंगला’ने जगभरात 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाचा बजेट 120 कोटी रुपये आहे. लवकरच हा बजेट वसूल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जी कमाई होईल, ती नफ्यात मोजली जाईल. ‘भूत बंगला’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये अक्षय कुमार, परेश रावल, जिशू सेनगुप्ता, राजपाल यादव, तब्बू आणि वामिका गब्बी यांच्या भूमिका आहेत.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Aaditya Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप