AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

150 रुपयांमध्ये अर्धा लीटर पाणी, बॉलिवूड अभिनेत्री का विकतेय इतके महाग पाणी, कारण ऐकून..

अक्षय कुमारसोबत काम केलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री 500 MLची पाणी बॉटल विकते 150 रुपयांना. इतकी किंमत जास्त का याचेही सांगितले कारण.

150 रुपयांमध्ये अर्धा लीटर पाणी, बॉलिवूड अभिनेत्री का विकतेय इतके महाग पाणी, कारण ऐकून..
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 29, 2026 | 12:54 PM
Share

बॉलिवूड सेलिब्रिटी आता अभिनयाबरोबरच व्यवसाय क्षेत्रातही आपली छाप पाडताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी ब्युटी, फॅशन आणि लाइफस्टाइल ब्रँड्स सुरू केले आहेत. मात्र काही वेळा या व्यवसायांमुळे त्यांना ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. अशाच चर्चेत आलेले नाव म्हणजे अभिनेत्री भूमी पेडणेकर.

भूमी पेडणेकरने 2025 साली आपला प्रीमियम वॉटर ब्रँड ‘Backbay’ लॉन्च केला. मात्र या ब्रँडची किंमत समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा आणि टीका झाली. अर्धा लिटर पाण्याची बाटली सुमारे 150 रुपये, तर 750 ml पॅक सुमारे 200 रुपयांना विकला जात असल्याने अनेकांनी या किंमतीवर प्रश्न उपस्थित केले.

इतकी महाग पाणी बॉटल का?

अलीकडेच एका यूट्यूब मुलाखतीत भूमी पेडणेकरने या ट्रोलिंगबाबत प्रतिक्रिया दिली. तिने सांगितले की, ती लवकरच आपल्या ब्रँडचा विस्तार करणार असून स्पार्कलिंग वॉटरही बाजारात आणणार आहे. तिने मान्य केले की तिचा ब्रँड महाग आहे पण तो प्रीमियम कॅटेगरीत येतो आणि या कॅटेगरीतील इतर ब्रँड्सचे दर यापेक्षाही जास्त असल्याचे तिने स्पष्ट केले.

भूमि म्हणाली, आम्ही हा व्यवसाय पूर्णपणे नैतिक पद्धतीने चालवत आहोत. ग्राहकांना सर्वात शुद्ध उत्पादन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही फक्त पाण्याचा ब्रँड नाही तर पेय पदार्थांच्या क्षेत्रात एक लाइफस्टाइल ब्रँड बनण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि विकास करत आहोत.

माझा ब्रँड प्रीमियम सेगमेंटमध्ये आहे आणि मला याची पूर्ण जाणीव आहे. भारतात अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आहेत, ज्यांचे पाणी 400 ते 500 रुपयांपर्यंत विकले जाते. त्यामुळे आमचे दर त्या तुलनेत कमीच आहेत.

500 ml चा 12 बाटल्यांचा पॅक किंमत किती?

भूमी पेडणेकरने हेही स्पष्ट केले की, भविष्यात जर तिने मास मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला तर ती ‘Backbay’साठी वेगळा ‘सिस्टर ब्रँड’ लॉन्च करेल. सध्या मात्र तिचे लक्ष प्रीमियम ग्राहकांवर आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ‘Backbay’च्या अधिकृत वेबसाइटवर 500 ml चा 12 बाटल्यांचा पॅक सुमारे 1,556 रुपयांना मिळतो, म्हणजेच एका बाटलीची किंमत सुमारे 129 रुपये होते. तर 750 ml चा 12 बाटल्यांचा पॅक सुमारे 2,111 रुपयांना विकला जातो, म्हणजे प्रति बाटली सुमारे 176 रुपये.

Follow Us
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?
मुंबईत पावसाचा कहर! बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर पाणीच
Viral Video | मुंबईत पावसाचा कहर! बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर पाणीच पाणी
Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे'तील धक्कादायक दृश्य, पहा
Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे'तील धक्कादायक दृश्य, पहा व्हिडीओ
फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच
Devendra Fadnavis | 6 तारखेपर्यंत धोका! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच
आणखी एका नेत्याची जीभ घसरली, थेट म्हणाले, रस्त्यावर उतरूनकाय उXXX...
आणखी एका नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, रस्त्यावर उतरून तुम्ही काय उXXX...
सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही संपादक होता येतं; फडणवीसांचा नाव
Devendra Fadnavis | सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही संपादक होता येतं; मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता संजय राऊतांवर घणाघात
मुंबईत भयंकर घडलं! धो धो बरसणाऱ्या पावसात रस्ताच... Video तुफान
Video | मुंबईत भयंकर घडलं! धो धो बरसणाऱ्या पावसात रस्ताच... व्हिडीओ तुफान व्हयरल