AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 : ब्रेकअपनंतर एक्स – गर्लफ्रेंडला जीवे मारण्यासाठी MC Stan ने रचला कट?

अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे 'बिग बॉस १६' चा विजेता एमसी स्टॅन... ब्रेकअपनंतर एक्स - गर्लफ्रेंडला जीवे मारण्यासाठी एमसी स्टॅन याने खास व्यक्तीची मदत घेत रचला कट?

Bigg Boss 16 : ब्रेकअपनंतर एक्स - गर्लफ्रेंडला जीवे मारण्यासाठी MC Stan ने रचला कट?
| Updated on: Feb 13, 2023 | 1:46 PM
Share

Bigg Boss 16 Winner MC Stan : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती की, ‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी कोणाला मिळेल. अखेर रविवारी अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान याने ‘बिग बॉस १६’ च्या विजेत्याची घोषणा केली. ‘बिग बॉस १६’ चा विजेता म्हणून सलमान खान याने एसमी स्टॅन (MC Stan) याच्या नावाची घोषणा केली. ‘बिग बॉस १६’ चा विजेता म्हणून निवडून आल्यानंतर एमसी स्टॅन तुफान चर्चेत आहे. एमसी स्टॅन याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयु्ष्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. एमसी स्टॅन याच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे रॅपर तुफान चर्चेत आला असून वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला. (Bigg Boss 16 Winner MC Stan)

२२ वर्षीय एमसी स्टॅन याचं खरं नाव अल्ताफ शेख असं आहे. एक रॅपर म्हणून प्रवास सुरु केल्यानंतर त्याने स्वतःचं नाव एमसी स्टॅन असं ठेवलं. एमसी स्टॅन याने वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षात गाण्याच्या प्रवास सुरु केला. एमसी स्टॅन याने कव्वाली पासून संगीताची सुरुवात केली. पण एमसी स्टॅन याने स्वतःला काळानुसार बदलंल आणि रॅपर म्हणून प्रसिद्धी मिळवली. फार कमी वयात एमसी स्टॅन याने यशचं शिखर गाठलं आहे.

पण चांगल्या गोष्टींसोबतच एमसी स्टॅन याच्या आयुष्यात अनेक वाईट गोष्टी देखील घडल्या. आता एमसी स्टॅन याला त्याच्या गाण्यांसाठी ओळखलं जातं. रॅपर त्याच्या गाण्यांमध्ये वाईट शब्दांचा देखील वापर करतो. एमसी स्टॅन याची गाणी ऐकणाऱ्यांची लिस्ट देखील फार वेगळी आहे. गाण्यांमुळे देखील एमसी स्टॅन वादाच्या भोवऱ्यात अडकला.

एमसी स्टॅनचं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप

एमसी स्टॅन याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याने ब्रेकअपनंतर एक्स – गर्लफ्रेंडला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. एमसी स्टॅन याने एक्स – गर्लफ्रेंडला जीवे मारण्याचा मॅनेजरला पाठवलं होत. याचदरम्यान एमसी स्टॅन याची एक्स – गर्लफ्रेंड जखमी देखील झाली होती. याप्रकरणानंतर एक्स – गर्लफ्रेंडने पोलिसांत तक्रार देखील दाखल केलं. या घटनेनंतर एमसी स्टॅन सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. (Bigg Boss 16 Winner MC Stan ex-girlfriend)

एमसी स्टॅन याची संपत्ती…

बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन याच्या चेन आणि ड्रेसिंग स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधलं. सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन ८० हजार रुपयांचे बूट आणि दीड कोटी रुपयांची चेनची तुफान चर्चा रंगली. मिळालेल्या माहितीनुसार एमसी स्टॅन याची एकुण संपत्ती जवळपास १६ कोटी रुपये आहे. एमसी स्टॅन त्याच्या रॅपर कॉन्सर्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. (Bigg Boss 16 Winner net worth)

Follow Us
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....