AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 : ‘जे व्हायचं ते झालं…’, एमसी स्टॅन विजयी झाल्यानंतर शिव ठाकरे याची प्रतिक्रिया

Bigg Boss 16 विजेतेपदासाठी शर्यतीमध्ये असलेल्या प्रियंका चौधरी - शिव ठाकरे यांची हार... तर ट्रॉफीवर एमसी स्टॅन याचं नाव नोंदल्यानंतर शिव म्हणाला, 'जे व्हायचं ते झालं...'

Bigg Boss 16 : 'जे व्हायचं ते झालं...', एमसी स्टॅन विजयी झाल्यानंतर शिव ठाकरे याची प्रतिक्रिया
Shiv ThakareImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 13, 2023 | 11:30 AM
Share

Bigg Boss 16 : रविवारी ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) शोच्या विजेत्याची घोषणा झाली आणि  चाहत्यांसह विजेत्याने मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केला. अभिनेता आणि बिग बॉस १६’ शोचा होस्ट सलमान खान (salman khan) याने विजेत्याचं नाव घोषित केलं आणि स्पर्धकांसह चाहते देखील चकित झाले. बिग बॉस १६’ मध्ये  शिव ठाकरे (shiv thakare) आणि प्रियंका चौधरी यांमध्ये ‘कांटे की टक्कर’ होती. पण ‘बिग बॉस १६’ च्या ट्रॉफीवर एमसी स्टॅनचं नाव कोरलं गेलं. सध्या सर्वत्र एमसी स्टॅन याच्या नावाची चर्चा आहे. ‘बिग बॉस १६’ च्या विजेत्याची घोषणा केल्यानंतर शिव ठाकरेला,  ट्रॉफी एमसी स्टॅन (MC Stan) याला मिळाल्यानंतर तू नाराज आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शिव याने प्रतिक्रिया दिली आहे.

शिव म्हणाला, ‘जे व्हायचं होतं ते झालं… ट्रॉफी माझ्या मंडळीतील एमसी स्टॅन घेवून गेला. त्यामुळे मी प्रचंड आनंदी आहे. शिवाय शेवटच्या दिवसापर्यंत विजयी होण्यासाठी मी प्रयत्न केलं. जी गोष्ट मी मनापासून केली, ती मला भेटली आहे. अनेकांनी माझं कौतुक केलं, मला पाठिंबा दिला… लोकांचं प्रेम घेवून मी बाहेर निघालो आहे..’ (MC Stan lifestyle)

पुढे शिव म्हणाला, ‘काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण काही गोष्टी आपल्या उज्वल भविष्यासाठी होत असतात. कारण आपल्या मनात जी जिंकण्याची भूक असते ती अधिक तिव्र होते आणि विजयाची भूक आता माझी वाढली आहे. पुढचा दरवाजा वाट पाहत आहे. जे काही करेल ते मेहनतीने आणि जिद्दीने करेल… कायम माझ्या जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात राहिल…’ असं देखील शिव ठाकरे म्हणाला.

सांगायचं झालं तर, बिग बॉसनंतर शिव ठाकरे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘खतरो के खिलाडी १३’ शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आता शिवला नव्या शोमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. सोशल मीडियावर देखील शिव ठाकरे याच्या चर्चा रंगलेल्या असतात. खुद्द बिग बॉसने देखील शिव ठाकरेचं शोच्या आठवड्यात कौतुक केलं आहे. ( Bigg Boss 16 Winner MC Stan)

बिग बॉसने केलं शिव ठाकरे याचं कौतुक

शिव ठाकरे याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खुद्द बिग बॉस यांनी शिव ठाकरे याचं कौतुक केलं आहे. ज्यामुळे शिव प्रचंड भावुक झाला आणि ‘बिग बॉस तुम्ही सिनेमाच तयार केला आणि मला हिरो केलं.’ आनंदामध्ये शिवने अनेकदा मंचावर डोक टेकवत आभार मानले. बिग बॉस तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे तू दाखवून दिलं आहेस. असं देखील बिग बॉस म्हणाले. (shiv thakare instagram)

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.