MC Stan : कोट्यवधींची चेन, ८० हजरांचे बूट; जाणून घ्या ‘बस्ती की हस्ती’ एमसी स्टॅनची संपत्ती

कोट्यवधींचा मालक आहे एमसी स्टॅन... कशी कमावतो कोट्यवधींची माया, 'बस्ती की हस्ती' एमसी स्टॅनच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा

MC Stan : कोट्यवधींची चेन, ८० हजरांचे बूट; जाणून घ्या 'बस्ती की हस्ती' एमसी स्टॅनची संपत्ती
Bigg Boss 16 Winner MC Stan
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 10:01 AM

Bigg Boss 16 Winner MC Stan : छोट्या पडद्यावरचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस १६’ आता संपला आहे. रविवारी अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान (salman khan) याने मोठ्या उत्साहात ‘बिग बॉस १६’ चा विजेता घोषित केला आणि चाहत्यांना चक्क केलं. कारण ‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी शिव ठाकरे (shiv thakare) किंवा प्रियंका चौधरी (priyanka chaudhari) घरी घेवून जाईन अशी चर्चा रंगली होती. पण ‘बिग बॉस १६’ विजेता म्हणून सलमान याने एमसी स्टॅन (MC Stan) याचं नाव घोषित केलं. ‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर एमसी स्टॅन याच्या चेहऱ्यावरील आनंद फार वेगळा होता. ‘बिग बॉस १६’ च्या घरातील एमसी स्टॅनचा प्रवास फार चकित करणारा होता.

शोमध्ये मित्रांच्या मदतीने आणि जिद्दीने एमसी स्टॅन याने स्वतःचं स्थान भक्कम केलं. शोमध्ये एमसी स्टॅन याने अनेक चढ-उतार पाहिले. शोमध्ये एमसी स्टॅन हसला, निराश झाला… पण टॉप ५ पर्यंत जाण्यासाठी एमसी स्टॅन याने पूर्ण प्रयत्न केलं आणि बिग बॉस १६ ची ट्ऱॉफी आपल्या नावावर केली. विजेता म्हणून एमसी स्टॅन याला ३१ लाख ८० हजार रुपये आणि एका कार मिळाली आहे. सध्या एमसी स्टॅन तुफान चर्चेत आहे. (mc stan net worth)

View this post on Instagram

A post shared by MC STΔN  (@m___c___stan)

एमसी स्टॅन मुळचा पुण्याचा आहे. पुण्यात एमसी स्टॅन एका बस्तीमध्ये राहायचा. त्याच्या आयुष्यात अनेक वाद होते. एमसी स्टॅन याच्या गाण्यांमुळे देखील अनेक वाद रंगले. पण बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन याच्या चेन आणि ड्रेसिंग स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधलं. सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन ८० हजार रुपयांचे बूट आणि दीड कोटी रुपयांची चेनची तुफान चर्चा रंगली. अनेकदा सलमान खान याने देखील एमसी स्टॅन याच्या लाईफ स्टाईलवर वक्तव्य केलं.

एमसी स्टॅन याच्या महागड्या कपड्यांवर आणि लाईफ स्टाईलवर सर्वांचं लक्ष असतं. मिळालेल्या माहितीनुसार एमसी स्टॅन याची एकुण संपत्ती जवळपास १६ कोटी रुपये आहे. एमसी स्टॅन त्याच्या रॅपर कॉन्सर्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. शिवाय एमसी स्टॅन नवीन गाणी देखील प्रदर्शित करत असतो. सध्या सर्वत्र ‘बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅन याच्या नावाची चर्चा आहे. (mc stan real name)

रॅपर एमसी स्टॅन कायम त्याच्या गाण्यामुळे देखील चर्चेत असतो. शिवाय बिग बॉसच्या घरात देखील एमसी स्टॅन याच्यासाठी कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. रॅपर एमसी स्टॅन त्याच्या चाहत्यांमध्ये देखील प्रंचंड प्रसिद्ध आहे. रॅपर एमसी स्टॅन याच्या चाहत्यांची संख्या मोठी असल्यामुळे बिग बॉसच्या टीआरपीला देखील त्याचा फायदा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.