Bigg Boss 16 : कव्वाल ते बिग बॉसचा विनर; अस्सल पुणेकर एमसी स्टॅनचा हा संघर्ष माहीत आहे काय?

'समझ मेरी बात को' हे गाणं गाऊन त्याने करीअरची सुरुवात केली. या गाण्यातून त्याने डिव्हाईन आणि एमीवे आदी गायकांवर टीका केली होती. त्यामुळे स्टॅन ट्रोलही झाला होता.

Bigg Boss 16 : कव्वाल ते बिग बॉसचा विनर; अस्सल पुणेकर एमसी स्टॅनचा हा संघर्ष माहीत आहे काय?
m c stanImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 8:59 AM

मुंबई: रॅपर एमसी स्टॅन हा बिग बॉस 16 सीजनचा विजेता ठरला आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकून स्टॅनने गेल्या काही वर्षातील अनेक रेकॉर्डही मोडीत काढले आहेत. विशेष म्हणजे एमसी स्टॅन जिंकणार नाही असंच वाटत होतं. प्रियंका चाहर चौधरी किंवा शिव ठाकरे या दोघांपैकी एकजण विजयी होतील असं सर्वांनाच वाटत होतं. असं असतानाही स्टॅनने विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅनने अनेकवेळा आपल्या कलेचं प्रदर्शन घडवलं आहे. रॅप साँग गाणारा गायक म्हणून स्टॅन प्रसिद्ध आहे. त्याचा स्वत:चा एक चाहता वर्ग आहे. बिग बॉसच्या घरातही त्याची प्रचिती आली होती. त्यामुळे त्याला त्याच्या चाहत्यांसह इंडस्ट्रीत अनेक रॅपर्सनीही पाठिंबा दिला. त्यामुळेच तो बिग बॉसचा विनर होऊ शकला. सर्वाधिक व्होट मिळवून स्टॅनने बिग बॉसची ट्रॉफी खिशात घातली आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहे स्टॅन?

एमसी स्टॅनचं संपूर्ण नाव अल्ताफ शेख आहे. तो पुण्यातील रहिवाशी आहे. पुण्यात एका वस्तीत तो राहतो. लहानपणापासूनच तो गरिबीत वाढला. स्टॅनने त्याच्या करिअरची सुरुवात कव्वाली गायक म्हणून केली होती. बरीच वर्ष तो कव्वाली गायन करायचा. वयाच्या 12 व्या वर्षापासून तो गायन क्षेत्रात आहे.

कव्वाली गाता गाता त्याचं लक्ष रॅपकडे गेलं. हा काही तरी वेगळा प्रकार आहे. त्यात वेगळ काही करता येईल असं त्याला वाटू लागलं. त्यामुळे रॅपकडे आकर्षित होऊन त्याने कव्वाली गायन बंद करून तो रॅपर बनला.

रस्त्यावर झोपला

एकेकाळी स्टॅनला रस्त्यावर झोपावं लागलं आहे. लहानपणापासून त्याच्या वाट्याला संघर्ष आला. गरीबीत आयुष्य गेलं. त्याचं शिक्षणात मन रमत नव्हतं. त्याचा कल गाण्याकडे होता. त्यामुळे घरच्यांकडून त्याला नेहमी बोलणं खावं लागायचं.

‘वाटा’ने लोकप्रिय केलं

‘समझ मेरी बात को’ हे गाणं गाऊन त्याने करीअरची सुरुवात केली. या गाण्यातून त्याने डिव्हाईन आणि एमीवे आदी गायकांवर टीका केली होती. त्यामुळे स्टॅन ट्रोलही झाला होता. त्यानंतर त्याचं ‘अस्तगफिरुल्लाह’ हे गाणं आलं.

त्यातून त्याने त्याच्या संघर्षाची कहानी सांगितली होती. या गाण्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोण बदलला. त्याने असंख्य रॅप साँग म्हटली आहेत. मात्र, ‘वाटा’ या गाण्याने त्याचं नशीब बदललं.

हिप हॉप रॅपर सिंगर्स

एमसी स्टॅनचं नाव हिप हॉप रॅपर सिंगर्सच्या यादीत समाविष्ट आहे. स्टॅन जितका फेमस आहे, तेवढेच त्याच्या गाण्याचे वादही आहेत. गाण्यातील शब्दांमुळे तो नेहमीच वादात राहिला आहे. स्टॅनने रॅपर रफ्तारसोबतही काम केलं आहे.

गर्लफ्रेंडसोबतच निकाह करणार

त्याच्या व्यक्तीगत आयुष्याबाबत सांगायचं म्हणजे त्यानेच त्याची माहिती बिग बॉसमध्ये दिली आहे. स्टॅनला आईवडील आहेत. ते पुण्यात असतात. त्याची एक गर्लफ्रेंड आहे. बूबा असं तिचं नाव आहे. तिच्यावर तो प्रेम करत असून तिच्याशीच तो निकाहही करणार आहे.

Non Stop LIVE Update
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.