AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 : बिग बॉसमध्ये पराभूत होऊनही प्रियंकाची घसघशीत कमाई, पैसे आणि सिनेमाही मिळाला; आकडा किती माहित्ये?

प्रियंकाला 25 लाख आणि अॅड तर मिळालीच आहे. शिवाय तिला एका सिनेमात काम करण्याची संधीही मिळाली आहे. तिला डंकी या सिनेमात काम मिळालं आहे.

Bigg Boss 16 : बिग बॉसमध्ये पराभूत होऊनही प्रियंकाची घसघशीत कमाई, पैसे आणि सिनेमाही मिळाला; आकडा किती माहित्ये?
Priyanka Chahar ChoudharyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 13, 2023 | 7:07 AM
Share

मुंबई: बिग बॉसच्या 16व्या सीजनचा एमसी स्टॅन हा विजेता ठरला आहे. शिव ठाकरे आणि प्रियंका चहर चौधरी यांना मागे टाकत स्टॅनने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आहे. स्टॅनचा विजय प्रेक्षकांसाठी अनपेक्षित होता. पण स्टॅनने जिंकून दाखवलं आहे. त्याला 31 लाख रुपये आणि एक लक्झरी कार बक्षिस म्हणून मिळाली आहे. स्टॅनने पुरस्काराची मोठी रक्कम जिंकली असली तरी प्रियंकानेही त्याच्याखालोखाल कमाई केली आहे. त्यामुळे ती पराभूत होऊनही फायद्यातच राहिली आहे.

बिग बॉस 16चे ग्रँड फिनाले काल संध्याकाळी 7 वाजता सुरू झालं. यावेळी बिग बॉसचे सर्व स्पर्धक स्टेजवर हजर होते. पहिल्या टॉप स्पर्धकांपैकी सर्वात आधी शालीन भनोट स्पर्धेतून बाहरे पडली. त्यानंतर अर्चा गौतम बाहेर पडली. शालीन शोमधून बाहेर पडल्याने ती निराश होती.

पण तिची निराशा लगेच दूर झाली. एकता कपूरने तिला एका नव्या प्रोजेक्टमध्ये घेतलं. प्रियंका चहर चौधरीलाही अशीच गुड न्यूज मिळाली. त्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने आधीच ब्युटी कॉन्टेस्ट जिंकून 25 लाखाची घसघशीत रक्कम जिंकली होती.

डबल आनंद

कलर्स चॅनलचे स्पॉन्सर माय ग्लॅमने बिग बॉस 16च्या दरम्यान एक ब्युटी कॉन्टेस्ट ठेवली होती. त्यात बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांनी भाग घेतला. ज्या स्पर्धकाला प्रेक्षक सर्वाधिक व्होटिंग करतील तिला माय ग्लॅमच्या एका अॅडमध्ये श्रद्धा कपूरच्यासोबत काम करायला मिळेल.

तसेच 25 लाखाचं बक्षिसही मिळेल. प्रियंकाने ही स्पर्धा जिंकून अॅड आणि पुरस्काराची रक्कम आपल्या खिशात घातली आहे. याशिवाय तिला आणखी एक सरप्राईज मिळालं आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

सिनेमात काम करण्याची संधी

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंकाला 25 लाख आणि अॅड तर मिळालीच आहे. शिवाय तिला एका सिनेमात काम करण्याची संधीही मिळाली आहे. तिला डंकी या सिनेमात काम मिळालं आहे. त्याशिवाय सलमान खाननेही तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सलाना एवढ्यावरच थांबला नाही तर या शोची खरी विजेती प्रियंकाच असल्याचंही त्याने सांगितलं.

प्रियंकाची प्रोफाईल आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. काही ओटीटी शो आणि टीव्हीवरील जाहिरातीही तिने केल्या आहेत. अत्यंत कमी वेळात आणि छोट्या करियरमध्ये प्रियंकाने खूप काही करून दाखवलं आहे. भविष्यातही ती अधिक प्रोजेक्ट्स करण्याची शक्यता आहे.

हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका.
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!.
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर.
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा.
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल.
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.