AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 Winner MC Stan | एमसी स्टॅन याने जिंकली ‘बिग बाॅस 16’ ची ट्रॉफी, शिव ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर, वाचा काय घडले ग्रँड फिनालेमध्ये

शेवटी आता बिग बाॅस 16 ला त्याचा खरा विजेता मिळाला आहे. ट्रॉफीसाठी शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित सुरूवातीपासूनच होती.

Bigg Boss 16 Winner MC Stan | एमसी स्टॅन याने जिंकली 'बिग बाॅस 16' ची ट्रॉफी, शिव ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर, वाचा काय घडले ग्रँड फिनालेमध्ये
| Updated on: Feb 13, 2023 | 1:04 AM
Share

मुंबई : बिग बाॅसच्या 16 व्या सीजनने सुरूवातीपासूनच टीआरपीमध्ये धमाका केला आहे. शिव ठाकरे, एमसी स्टॅन (MC Stan), प्रियंका चाैधरी, अर्चना गाैतम आणि शालिन भनोट हे टाॅप 5 मध्ये दाखल झाले होते. बिग बाॅसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बिग बाॅसचा ग्रँड फिनाले हा तब्बल पाच तासापेक्षाही अधिक वेळ चालला आहे. यामध्ये शालिन भनोट याच्यापासून ते सुंबुल ताैकीर खान यांचे डान्स बघायला मिळाले. सलमान खान (Salman Khan) याने देखील यावेळी जबरदस्त मनोरंजन प्रेक्षकांचे केले. या ग्रँड फिनालेमध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे प्रियंका आणि शिव ठाकरे यांचा डान्स. सुरूवातीपासूनच बिग बाॅसच्या घरात शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरी यांच्यामध्ये खटके उडताना दिसत होते. मात्र, धमाकेदार यांनी डान्स केला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सतत चर्चा होत्या की, अखेर बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) चा विजेता कोण होणार? चाहते आपल्या आवडत्या स्टारला सपोर्ट मोठ्या प्रमाणात करत होते. शेवटी आता बिग बाॅस 16 ला त्याचा खरा विजेता मिळाला आहे. ट्रॉफीसाठी शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित सुरूवातीपासूनच होती.

सोशल मीडियावर सर्वात जास्त शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनच्या नावाची चर्चा होती. आता शेवटी बिग बाॅस 16 ला त्याचा विजेता मिळाला आहे. एमसी स्टॅन याने बिग बाॅस 16 ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर प्रियंका चाैधरी ही बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्याने अनेकांना मोठा धक्का बसला. एकीकडे अंकित गुप्ता हा रडताना दिसला तर दुसरीकडे आनंदाने उड्या मारताना साजिद खान आणि अब्दु दिसले.

सुरूवातीपासूनच मंडळीची इच्छा होती की, काहीही झाले तरीही बिग बाॅस 16 ची ट्रॉफी ही मंडळीकडेच आली पाहिजे. शेवटी तेच घडले आणि बिग बाॅस 16 ची ट्रॉफी मंडळीकडेच आलीये.

फायनलमध्ये शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोघेजण होते. वोट सर्वात जास्त मिळाल्याने एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला. मंडळीकडे ट्रॉफी आल्याने सर्वांनाच मोठा आनंद झाला.

एमसी स्टॅन हा एक रॅपर असून तो पुण्यातील आहे. सुरूवातीपासून एमसी स्टॅन याचा गेम जबरदस्त होता. तो कधीही घरामध्ये नाटक करताना दिसला नाही. मंडळीमधील महत्वाचा सदस्य एमसी स्टॅन हा होता.

विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.