AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चक्क फिनालेच्या अगोदरच प्रियंका चाैधरी हिच्या हातामध्ये बिग बाॅस 16 ची ट्रॉफी, प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट

सध्या प्रियंका चाैधरी हिचा एक फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये प्रियंका चाैधरी हिच्या हातामध्ये बिग बाॅस १६ ची चक्क ट्रॉफी दिसत आहे.

चक्क फिनालेच्या अगोदरच प्रियंका चाैधरी हिच्या हातामध्ये बिग बाॅस 16 ची ट्रॉफी, प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट
| Updated on: Feb 10, 2023 | 3:09 PM
Share

मुंबई : बिग बाॅस १६ चा फिनाले अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात सध्या शिव ठाकरे, शालिन भनोट, एमसी स्टॅन, प्रियंका चाैधरी आणि अर्चना गाैतम हे आहेत. यापैकीच एकजण बिग बाॅस १६ चा विजेता होणार आहे. फिनालेला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सोशल मीडियावर बिग बाॅसच्या निर्मात्यांवर अनेक आरोप केले जात आहेत. फिनाले विक (Finale Week) सुरू झाल्यापासून बिग बाॅसचे निर्माते हे प्रियंका चाैधरी हिला सपोर्ट करताना दिसत आहेत. यापूर्वीही अनेक वेळा प्रियंका चाैधरी चुकीची ज्यावेळी दिसत होती, त्यावेळी बिग बाॅसकडून तिला कायम मार्गदर्शन केले जात होते. आता फिनालेला काही तास शिल्लक असतानाही बिग बाॅस प्रियंका चाैधरी हिला फोकस करताना दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर युजर्स हे बिग बाॅसला टार्गेट करताना दिसत आहेत. यामध्ये एक फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

सध्या प्रियंका चाैधरी हिचा एक फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये प्रियंका चाैधरी हिच्या हातामध्ये बिग बाॅस १६ ची चक्क ट्रॉफी दिसत आहे. अनेकांना हा फोटो पाहून मोठा धक्का बसला आहे.

हा फोटो पाहून प्रियंका चाैधरीचे चाहते आनंदी झाले असून प्रियंकाच बिग बाॅस १६ ची विजेती झाल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोय. मात्र, दुसरीकडे ही ट्रॉफी प्रियंकाच्या हातामध्ये पाहून संपात व्यक्त केला जातोय.

बिग बाॅस १६ चा फिनाले हा रविवारी असून आताच प्रियंका चाैधरीच्या हातामध्ये ट्रॉफी कशी काय? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. अनेकांनी थेट यावरून बिग बाॅसच्या निर्मात्यांना टार्गेट करण्यास सुरूवात केलीये.

धक्कादायक बाब म्हणजे अर्शी खान हिने देखील हा फोटो शेअर करत प्रियंका चाैधरी हिला बिग बाॅस १६ ची विजेती म्हटले आहे. प्रियंका चाैधरी ही बिग बाॅसच्या घरात आपल्या मित्रासोबत दाखल झाली होती.

अंकित गुप्ता आणि प्रियंका चाैधरी हे बिग बाॅसच्या घरात दाखल झाले होते. मात्र, त्यानंतर अंकित हा बेघर झाला. सुरूवातीला अंकित गुप्ता त्यानंतर साैंदर्या शर्मा, मग टीना दत्ता आणि त्यानंतर आता अर्चना गाैतमसोबत प्रियंका चाैधरी गेम खेळताना दिसली.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.