Abhijeet Dipke : ‘आम्ही स्वत:च फसलोय, त्यामुळे..’, अभिजीत दीपके अचानक गप्प का झाले, स्वत:च केला खुलासा
Abhijeet Dipke : अभिजीत दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह अनेक सीजेपी नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं. रांका आणि दास आठ दिवस तिहार तुरुंगात होते. अजिंक्य शिंदेंची मुचलक्यावर सुटका झालेली.

मागच्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीने मौन का बाळगलय? अशी चर्चा सुरु आहे. त्यावर CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आम्ही काही गोष्टींमध्ये फसलोय. त्यामुळे अनेक मुद्यांवर बोलू शकत नाहीय. सीजेपी जामिया मिल्लियामध्ये प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आहे. IIT मुंबईमधील साहिल वाकुडेच्या कुटुंबासोबत सुद्धा आम्ही आहोत” आमच्यामागे पोलीस लावलेत असा आरोप अभिजीत दीपकेने केला. अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात त्यांनी म्हटलय की, “मी तुमच्या लोकांच्या बऱ्याच कमेंट्स वाचतोय. त्यात तुम्ही बोलताय की, मी साहिल वाकोडे बद्दल का बोलत नाहीय?. जामिया मिल्लिया इस्लामिया मध्ये जे होतय त्यावर सीजेपी गप्प का आहे? केरळमध्ये सुरु असलेल्या शिक्षकांच्या विरोध प्रदर्शनावर आम्ही का बोलत नाहीय?.भीमाशंकरमध्ये जे सुरु आहे, त्यावर गप्प का आहोत?. मी एवढच सांगेन की, अन्यायाविरोधात लढणाऱ्या प्रत्येकासोबत सीजेपी आहे” ‘ सीजेपी त्या सर्व लोकांसोबत उभी आहे’ असं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अभिजीत दीपकेने म्हटलय.
“साहिल वाकुडेच्या केस बद्दल मी अनेकदा बोललोय. तुम्ही माझ्या मिडिया बाइट्स ऐकून पाहू शकता. माझं टि्वटर उघडून पाहू शकता. ज्या पद्धतीने त्याचा आई-वडिलांना पोलिसांनी अटक केलेली, त्याबद्दल मी बोललेलो. अनेक विद्यार्थ्यांबद्दल आम्ही बोललो आहोत. जामिया आणि भीमाशंकरच्या विषयावर आम्ही बोलत आहोत. आताच मी स्टेटमेंट रिलीज केलय” असं अभिजीत दीपके म्हणाले.
View this post on Instagram
आमच्याकडे भरपूर कार्यकर्ते नाहीयत
दीपके यांनी लोकांना आवाहन केलं की, ‘सीजेपीकडे फार साधनं नाहीयत. तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की, सीजेपी30-40 वर्ष जुनी संघटना नाहीय’ “आमच्याकडे भरपूर कार्यकर्ते नाहीयत. सीजेपी तीन-चार महिन्यापूर्वी सुरु झालेला एक उपक्रम आहे. जो तुमच्या पाठिंब्याने इतका मोठा झालाय. तुमच्या सपोर्टने आम्ही यशस्वी झालो आहोत” असं अभिजीत दीपके म्हणाले.
आम्ही प्रत्येक मुद्यावर बोलण्याचा प्रयत्न करु
“माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, जर आम्ही कुठल्या विषयावर बोलत नसू तर आम्हाल थोडा वेळ द्या. मी म्हटलेलं की, आमची मोठी संघटना नाहीय. आमच्याकडे भरपूर साधनं नाहीयत. आम्ही थोडेच लोक आहोत. तुमच्या सहकार्याने आम्ही काम करत आहोत. पुढे जाऊन आम्ही अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करु. आम्ही प्रत्येक मुद्यावर बोलण्याचा प्रयत्न करु” असं अभिजीत दीपके म्हणाले.
