कुनिकाचा Love Life बद्दल मोठा खुलासा, 2 लग्न, 2 लिव्हइन, 4 बॉयफ्रेंड्स आणि बरंच काही..
Bigg Boss 19 : अभिनेत्री कुनिका सदानंद हिचं खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य, अनेकांसोबत तिने प्रेमसंबंध... 'बिग बॉस 19' च्या घरात अभिनेत्री सतत खासगी आयुष्यावर करतेय चर्चा...

Bigg Boss 19 : ‘बिग बॉस 19’ ची स्पर्धक आणि अभिनेत्री कुनिका सदानंद कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता कुनिका तिच्या कामामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कुनिका हिची चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस 19’ च्या घरात कुनिका स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे करत आहे. आता देखील कुनिकाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
सांगायचं झालं तर, मृदुल तिवारी याने कुनिका हिला तिच्या आयुष्यातील एक चांगल्या आणि एक वाईट गोष्टीबद्दल विचारलं. मृदुल, गौरव आणि प्रणित यांच्यासोबत बोलताना कुनिका म्हणाली, एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्रीला दारूचं व्यसन लागलं होतं. सध्या सर्वत्र कुनिका हिची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री म्हणाली, ‘मी ड्रग्सचं सेवन कधीच केलं नाही. पण आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा ब्रेकअपनंतप मी पूर्णपणे खचली होती. सतत दारू प्यायल्यामुळे मी जाड देखील झाली होती. त्यानंतर एकदा डबिंग करताना मी स्वतःकडे पाहिलं आणि म्हणाली मी कशी दिसत आहे…
डिनर डेटबद्दल कुनिका म्हणाली, ‘मी अशा डिनर डेटवर गेली आहे, जिथे तो पुरुष फक्त 20 हजार रुपयांची शँपेन ऑर्डर करायचा… मी त्या पुरुषाचं नाव आत तुम्हाला सांगू शकत नाही…’ त्यानंतर गौवरने अभिनेत्रीला तिच्या रिलेशनशिपबद्दल विचारलं…
यावर कुनिका म्हणाली, ‘मी दोन वेळा लग्न केलं आहे. मी दोन वेळा लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिली आहे. यांच्याशिवाय माझे चार बॉयफ्रेंड होते. पण मी कधीच कोणत्याच अभिनेत्याला डेट केलं आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
कुनिका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, कुनिकाने मान्य केलं होतं की, अभिनेत्री दिग्गज गायक कुमार सानू यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. कुमार सानू आणि कुनिका एकमेकांना पती – पत्नी देखील मानत होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांना विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
