AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन कोमात होते तेव्हा… रेखा पांढरी साडी नेसून अल्या आणि… जया बच्चन मात्र…

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे... पण त्यांच्या नात्याबद्दल काही असे किस्से आहे, जे आजही कोणाला माहिती नाही... त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये सुरु असतात.

अमिताभ बच्चन कोमात होते तेव्हा... रेखा पांढरी साडी नेसून अल्या आणि... जया बच्चन मात्र...
| Updated on: Oct 11, 2025 | 11:16 AM
Share

‘अनजाने’ सिनेमातून महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखी एकमेकांच्या जवळ आले. दोघांमध्ये प्रेमाचं गुलाब फुललं. पण बिग बी विवाहित असल्यामुळे दोघांच्या नात्याचा पुढे जाऊन वाईट अंत होईल.. हे सर्वांना माहिती देखील होतं आणि तसंच झालं. बिग बी आणि रेखा यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा अभिनेत्री जया बच्चन यांच्यापर्यंत पोहोचल्या. अशात असं देखील समोर आलं की, जया यांनी रेखा यांनी घरी जेवणासाठी बोलावलं आणि ‘मी अमिताभ बच्चन यांना कधीच सोडणार नाही…’ असं म्हणाल्या… तेव्हा रेखा आणि अभिताभ बच्चन यांनी देखील दूर राहण्याचा निर्णय घेतला. सर्वांना वाटलं दोघांच्या नात्याचा अंत अखेर झाला, पण असं काही झालं नाही, तेव्हा तर सुरुवात झाली.

जया बच्चन यांच्या भेटीनंतर रेखा आणि बिग बी यांचं नातं संपल. पण मनात प्रेम तर कायम होतं… अशात नाराज असलेल्या रेखा यांनी बिग बींनी दिलेल्या सर्व अंगठ्या त्यांना परत केल्या. पण तरी देखील मनातील एका कोपऱ्यात बिग बी होतेच… त्यानंतर एक दिवस असा आला जेव्हा संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला…

अमिताभ बच्चन ‘कुली’ सिनेमाचं शुटिंग करत होते. सिनेमात एक फायटिंग सीन होता. ज्यामध्ये खलनायक पुनीत इस्सरला बिग बींना मारहाण करावी लागली. मार्शल आर्ट्समध्ये चौथ्या डिग्रीचा ब्लॅक बेल्ट असलेल्या पुनीतने या छोट्याशा लढाईच्या सीनसाठी अनेक वेळा रिहर्सल केली होती. शुटिंग सुरु झाली, पुनितने बिग बींना मारलं आणि जमीनीवर आपटलं… यादरम्यान, अमिताभ दुसऱ्या बाजूला पडले आणि एका टेबलावर आदळले. बिग म्हणाले, “मला मार लागला.” पुनीत म्हणाला, “फायटिंगमध्ये असं होतं… आराम करा.”

पण कोणालाच कल्पना नव्हती की, एक छोटी जखम बीग बींच्या जीवावर बेतेल… रुग्णालयातील तपासणीत आतड्याला दुखापत झाल्याचे दिसून आलं. बंगळुरूमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. ही बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. त्यांच्या आरोग्यासाठी सर्वत्र प्रार्थनांचा वर्षाव झाला. त्यानंतर त्यांना मुंबईतील कँडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे ते जवळजवळ कोमात होते.

कठीण काळात अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन सतत रडत होत्या. मंदिरात जायच्या आणि पतीच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करायच्या. मिळालेल्या माहितीनुसार, देश-विदेशातील लोक अभिनेत्याला भेटण्यासाठी येत होते. रुग्णालयात फक्त एकाच व्यक्तीला आत परवानगी नव्हती आणि ती व्यक्ती म्हणजे रेखा.

पण बिग बींवर असलेल्या प्रेमा खातर रेखा रुग्णालयात पोहोचल्या… एका मॅग्जीनच्या वृत्तानुसार, एका सकाळी, सूर्योदयापूर्वी, रेखा, पांढरी साडी नेसून आणि मेकअप न करता, बिग बींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या. त्या दारासमोर शांतपणे उभ्या राहिल्या आणि प्रार्थना करत होत्या. तेव्हा रेखा म्हणाल्या, “मी मरायला तयार होते, पण अशा असहाय्यतेत जगायला नाही.” असं म्हटलं जातं की, रेखाने बिग बींसाठी महाकालेश्वर येथे जप समारंभ आयोजित केला होता.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.