AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय नंतर सुनील शेट्टी कोर्टात पोहोचला, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Suniel Shetty : इंडस्ट्रीमध्ये असं काय होण आहे ज्यामुळे सेलिब्रिटी पोहोचतायेत कोर्टात, अनेक सेलिब्रिटींनंतर अभिनेता सुनील शेट्टी पोहोचला कोर्टात, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय नंतर सुनील शेट्टी कोर्टात पोहोचला, काय आहे संपूर्ण प्रकरण?
फाईल फोटो
| Updated on: Oct 11, 2025 | 8:39 AM
Share

Suniel Shetty : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. सुनील शेट्टीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अभिनेत्याने असा दावा केला आहे की, अनेक सोशल मीडिया पेज आणि वेबसाइट्सवर सुनील शेट्टी आणि अभिनेत्याच्या नातीच्या फोटोंचा वापर कोणत्याही परवानगीशिवाय व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी करत आहेत.

सुनील शेट्टी याने त्याच्या अंतरिम अर्जात न्यायालयाला विनंती केली आहे की, अशा सर्व वेबसाइटना त्यांचे फोटो तात्काळ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत आणि भविष्यात त्यांचा वापर करणं थांबवावा. सदर फोटो तात्काळ हटवण्यात यावेत व भविष्यात आपले फोटो वापरण्यावर संबंधित कंपन्यांना बंदी घालावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखून ठेवला आहे. याप्रकरणी शुक्रवारी न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपिठासमोर सुनावणी घेण्यात आली. शेट्टी आणि त्यांच्या नातीच्या बनावट प्रतिमा काही वेबसाइटवर आहेत. त्यामुळे ते तात्काळ हटवण्यात यावे असी मागणी असून न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला आहे… आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नात इवारा हिचे फेक फोटो

शुक्रवारी न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनील शेट्टी यांचे वकील बिरेंद्र सराफ यांनी काही वेबसाइट्सवर सुनील आणि त्यांची नात इवाराचे बनावट फोटो दाखवले, असा युक्तिवाद केल्यानंतर याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.

सुनील शेट्टी यांची नात

सुनील शेट्टी यांची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी – क्रिकेटर केएल राहुल यांनी 2023 मध्ये शाही थाटात लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील तुफान व्हायरल झाले. लग्नानंतर अथिया हिने मुलीला जन्म दिला. तर सुनील शेट्टीच्या नातीचं नाव इवारा असं आहे.

सुनील शेट्टीच्या आधी कोणत्या सेलिब्रिटींनी न्यायालयात धाव घेतली?

एखाद्या बॉलिवूड अभिनेत्याने आपल्या वैयक्तिक आणि प्रसिद्धी हक्कांचे रक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. सुनील शेट्टी याच्याआधी अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, करण जोहर, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन यांनी देखील न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...