29 वर्ष लहान बायकोसोबत कसं आहे 79 वर्षीय अभिनेत्याचं नातं? म्हणाला, ‘आम्ही दोघं…’
Love Life: मुलाच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याने उरकलं लग्न, दोघांमध्ये 29 वर्षांचं अंतर, चौथ्या बायकोबद्दल 79 वर्षीय अभिनेता म्हणातो, 'आम्ही दोघं...', अभिनेता कायम खासगी आयुष्यामुळे असतो चर्चेत...

Love Life: बॉलिवूडमध्ये कधी कोणीचं नाव कोणासोबत जोडलं जाईल काहीही सांगता येत नाही. झगमगत्या विश्वात नात्यांचं समिकरण फार वेगळं आहे. ब्रेकअप, लग्न, घटस्फोट… या गोष्टी सेलिब्रिटींसाठी सामान्य झाल्यात असं अनेकदा दिसून आलं… काही सिलेब्रिटींनी तर एक दोन नाही तर, चक्क चार वेळा लग्न केलं आहे. एका अभिनेत्याने तर स्वतःच्या पेक्षा 29 वर्ष लहान अभिनेत्रासोबत लग्न केलं. स्वतःच्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत लग्न केल्यामुळे अभिनेत्याला टीकेला सामना करावा लागला… आज देखील अभिनेत्या त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो…
सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते कबीर बेदी आहेत. कबीर यांनी फक्त बॉलिवूडच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण कबीर बेदी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, कबीर तब्बल चार वेळा लग्नबंधनात अडकले. ज्यामुळे त्यांचं वैवाहिक आयुष्य कायम चाहत्यांमध्ये चर्चाचा विषय ठरला. तीन वेळा घटस्फोट झाल्यानंतर कबीर बेदी यांनी 70 व्या वर्षी 2016 मध्ये परवीन दुसांझ सोबत लग्न केलं. चौथं लग्न आणि स्वतःपेक्षा 29 वर्ष लहान पत्नी असल्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी निशाणा साधला.
एका मुलाखतीत कबीर यांनी चौथ्य लग्नाबद्दल मोठं वक्तव्य देखील केलं. चौथ्या लग्नाबद्दल कबीर म्हणाले, ‘आमचं नातं चांगलं आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो… परवीन हिचं देखील स्वतःचं करीयर आहे. ती एक निर्माती आहे. तिने नेटफ्लिक्ससाठी Bod Of Billionaire निर्मित केली आहे. तिच्याकडे अन्य प्रोजेक्ट देखील आहेत. ती स्वतःची प्रगती करत आहे…’ असं कबीर बेदी म्हणाले.
कबीर बेदी यांच्या चौथ्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, परवीन एक मॉडेल, अभिनेत्री आणि निर्माती देखील आहे. लग्नाआधी परवीन आणि कबीर अनेक वर्ष लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहात होते. कबीर बेदी आणि परवीन हेदोघेही एकमेकांना जवळपास 3-4 वर्षे डेट करत होते असं म्हटलं जातं. कबीर बेदी कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करत असतात.
