अमृतासोबत घटस्फोट, सैफ अली खानला होतोय पश्चाताप, …म्हणून आजही आहेत एकमेकांच्या संपर्कात
Saif Ali Khan: 'या' कारणामुळे सैफ अली खान आणि अमृता सिंग घटस्फोटानंतर देखील आहेत एकमेकांच्या संपर्कात, पहिला संसार मोडल्याचा सैफला आजही होतोय पश्चाताप..., मोठं सत्य समोर

Saif Ali Khan: अभिनेता सैफ आली खान याच्या खसागी आयुष्याबद्दल आज अनेकांना माहिती आहे. अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी सैफ याने अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत संसार थाटला होता. तेव्हा सैफ बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात होता. तर अमृता मात्र लोकप्रिय अभिनेत्री होती. सैफ आणि अमृता यांनी गुपचूप लग्न तर केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. पण घटस्फोटानंतर आजही दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सैफ अली खान याने मोठा खुलासा केलाय. ‘अमृता हिचं माझ्या आयुष्यात मोठं योगदान आहे… ‘ असं अभिनेता म्हणालेला. सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट झाला, पण दोन मुलांचा बाप असल्यामुळे अभिनेता आनंदी आहे… सध्या सर्वत्र सैफ आणि अमृता यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, ‘आमच्या नात्याबद्दल मी अनेकदा बोललो आहे आणि 21 वर्ष फार लहान वय आहे. आणि यादरम्यान अनेक गोष्टी बदलतात. आम्हाला माहिती होती पुढे जाऊन अनेक गोष्टी बदलतील. पण आमची दोन मुलं आहेत. मला माहिती नाही यापूर्वी मी असं म्हणालो आहे की नाही, पण माझ्या आयुष्यात अमृताचा फार मोठा वाटा आहे. तिने मला समजावून घेतलं. आमचं लग्न टिकलं नाही, याचा पश्चाताप आहे…’ असं अभिनेता म्हणाला.
पुढे अभिनेता म्हणाला, ‘एवढ्या वर्षांमध्ये अनेक गोष्टी बदलल्या आहेत आणि ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. मी स्वतःला भाग्यशाली समजतो कारण माझ्या पूर्व पत्नीसोबत माझे आजही चांगले संबंध आहेत. आम्ही कायम महत्त्वाच्या गोष्टींवर संवाद साधतो… जेव्हा मी रुग्णालायात बेड असतो तेव्हा अमृता कायम माझी विचारपूस करत असते…’ असं देखील अभिनेता म्हणाला.
सैफ आणि अमृता याच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. लग्न झालं तेव्हा अमृता सैफपेक्षा बारा वर्षांनी मोठी होती. 1991 मध्ये दोघांनी लग्न केलं. 13 वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. सैफ आणि अमृता यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं नाव सारा आणि मुलाचं नाव इब्राहिम अली खान असं आहे.
सैफ अली खान आणि करीना कपूर
अमृता हिला घटस्फोट दिल्यानंतर सैफ अली खान याने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत लग्न केलं. आज करीना आणि सैफ चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. लग्नानंतर सैफ आणि करीना यांनी तैमूर – जेह या दोन मुलांचं जगात स्वागत केलं. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
