AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अखेर भारत अ‍ॅक्शन मोडमध्ये, जगाला स्पष्ट संदेश, इराणच्या बुडालेल्या युद्धनौकेवर पहिली प्रतिक्रिया

अमेरिकेनं इराणच्या युद्धनौकेवर हल्ला केला होता. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. अखेर आता यावर भारताकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एस. जयशंकर यांनी मोठं विधान केलं आहे.

मोठी बातमी! अखेर भारत अ‍ॅक्शन मोडमध्ये, जगाला स्पष्ट संदेश, इराणच्या बुडालेल्या युद्धनौकेवर पहिली प्रतिक्रिया
s jaishankarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 07, 2026 | 3:58 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा आठवा दिवस आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिका आणि इस्रायला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी भारतामधून इराणकडे परतत असलेल्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ही युद्धनौका बुडाली आहे. या घटनेत 87 जणांचा मृत्यू झाला, दरम्यान या घटनेची माहिती मिळताच श्रीलंकेने या भागात रेस्क्यू ऑपरेशन राबवून अनेक जणांचा जीव वाचवला होता. मात्र या घटनेवर भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नव्हती. अखेर यावर आता भारताची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले एस. जयशंकर?

भारत देखील संयुक्त राष्ट्राच्या समुद्री आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं समर्थन करतो. आम्हाला इराणकडून अशी सूचना मिळाली होती की, आमचं एक जहाज चुकीच्या ठिकाणी अडकलं आहे, त्यावेळी कदाचित ते जहाज भारताच्या सीमेपासून खूप जवळ होतं. त्यांना भारताच्या बंदरामध्ये यायचं होतं, त्यांनी सांगितलं की, आम्ही काही समस्यांचा सामना करत आहोत. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही इकडे येऊ शकतात. त्यानंतर त्यांना इथे येण्यासाठी काही दिवस लागले, त्यानंतर ही युद्धनौका कोचीमध्ये थांबली. त्यामध्ये अनेक नवीन कॅडेट्स होते. ते इथे आले, मात्र जेव्हा ही युद्धनौका भारतामधून निघाली तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती, ते फ्लीट रिव्ह्यूसाठी येत होते, पण दुर्दैवाने चुकीच्या दिशेनं अडकले होते. श्रीलंकेतही त्यांच्यापैकी एका युद्धनौकेच्या बाबतीत अशीच परिस्थिती होती, त्यांना जो निर्णय घ्यावा लागला तो त्यांनी घेता, मात्र दुर्दैवाने दुसऱ्या युद्धनौकेला ते करता आले नाही. आम्ही कायदेशीर मुद्द्यांव्यतिरिक्त त्यावेळी उद्धभवलेल्या परिस्थितीकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहिलं असं जयशंकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी एस. जयशंकर यांनी जगाला देखील स्पष्ट संदेश दिला आहे. हिंदी महासागर असा एकमेव महासागर आहे, ज्याचं नाव एखाद्या देशाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. आम्ही त्याच्या अगदी मध्यभागी आहोत. आमच्या प्रगतीमुळेच हिंदी महासागरातील दुसऱ्या देशांचा देखील फायदा होणार आहे, जे आमच्यासोबत काम करतील त्या देशांना त्याचा फायादा होईल. भारतच भारताची प्रगती ठरवेल, भारत ही प्रगती आपल्या ताकदीने ठरवेल, इतरांच्या चुकांनी नाही असं एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर