
सोशल मीडियावर आणि चाहत्यामध्ये कायम सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगलेली असते. आता देखील प्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीच्या लैंगिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. हा क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नाही तर दीपक चहर आहे. दीपक याची बहीण मालती सध्या ‘बिग बॉस 19’ मध्ये दमदार स्पर्धक म्हणून खेळत आहे. याच दरम्यान अभिनेत्री कुनिका सदानंद हिने मालती लेस्बियन असल्याचा दावा केला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
‘बिग बॉस 19’ शोमध्ये तान्या म्हणाली, मालतीने तिला प्लेटने मारण्याचा प्रयत्न केला. तान्या तिचा राग व्यक्त करत असतानाच कुनिकाने मालती लेस्बियन असल्याचा संशय व्यक्त केला. कुनिका हिच्या या दाव्यामुळे सोशल मीडियावर आणि मालती चहरच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांनी कुनिका हिच्यावर संताप देखील व्यक्त केला.
तान्या मित्तलशी बोलताना कुनिका म्हणाली, “जर मला एक गोष्ट सांगायची असेल तर मला खात्री आहे की, मालती लेस्बियन आहे. पण तान्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पुढे कुनिका म्हणाली, “तिची (मालती) देहबोली आणि ती ज्या पद्धतीने बोलते ते सारखंच वाटतं. त्याकडे लक्ष द्या.”
मालती हिच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कुनिका हिला ट्रोल केलं जात आहे… सोशल मीडियावर एक नेटकरी संताप व्यक्त करत म्हणाला, ‘नॅशनल टेलिव्हिजनवर एखाद्याच्या लैंगिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं चुकीचं आहे. कुनिकाला लाज वाटली पाहिजे.”
दरम्यान, काही युजर्सने तान्याचा बचाव करत म्हटलं की, तिने हिने यामध्ये काहीही चुकीचं केलं नाही आणि भविष्यात तिला लक्ष्य केलं जाऊ नये. दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “आता तान्याला दोष देऊ नका; ती यात सहभागी नाही.”
बिग बॉसच्या वीकेंड का वार बद्दल सांगायचं झालं तर, या आठवड्यात सलमान खान नाही तर रोहित शेट्टी घरातील सदस्यांना वास्तवाची ओळख करून देईल. नुकताच, वीकेंड का वारचे काही प्रोमो व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’मध्ये आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.