
Bigg Boss 19: ‘बिग बॉस 19’ च्या घरातील वाद, मैत्री, आणि प्रेमप्रकरण समोर येत आहेत. सोशल मीडियावर ‘बिग बॉस’चे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक सदस्य कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. पण सर्वात जास्त चर्चा तान्या मित्तल हिचा होत असते. तान्या बिग बॉसच्या घरात फक्त तिचे शाही शौक सांगत असते. तिच्या या किस्स्यांमुळे गौरव खन्ना आणि निलम गिरी यांचा भेजा फ्राय झाला आहे. तर प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे.
सोशल मीडियावर तान्या हिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तान्या हातात ग्लब्स घातले आहेत. गौरव तान्याची खिल्ली उडवत आणि म्हणतो, जेवणार कसं? यावर तान्या म्हणते, ‘अमाल मला आज भरवणार आहे आणि झिशान पाणी पाजणार… हा माझा बर्थडे वीक आहे… त्यामुळे मला प्रिंसेसे ट्रीटमेंट हवी आहे…’ त्यानंतर अखेर, अमाल तान्या हिला प्रिंसेस ट्रीटमेंट देतात आणि स्वतःच्या हाताने भरवतो आणि पाणी पाजतो… शहबाज देखील त्याची मदत करतो…
तान्या आणि निलम गप्पा मारत बसलेले असताना तान्या म्हणते, ‘मी ग्वाल्हेरहून आग्र्याला कॉफी घेण्यासाठी जाते. तिथेही ती ती पीत नाही. मी माझ्या गाडीत एक बर्फाचा डबा घेऊन जातो, जिथे मी माझी कॉफी ठेवते. मी ग्वाल्हेरला परत येते आणि माझ्या बागेत बसून ती पिते. लंडनहून दर दोन महिन्याला बिस्किट येतात. तेच बिस्किट मी खाते. बिस्किट नाही मिळाले तर मी रडायला लागते… दिल्लीला एक हॉटेल आहे… मी त्याच हॉटेलमधील डाळ खाते…. तेव्हा मी माझ्या स्टाफला सुट्टी देते… दिल्लीला जाते आणि दाळ खाऊन घरी येते…’, सध्या सर्वत्र तान्या हिचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
बिग बॉसच्या अनेकांमध्ये प्रेम देखील बहरतं… आता तान्या मित्तल आणि अमाल मलिक यांचं नाव देखील एकमेकांसोबत जोडलं जात आहे. उर्फी जावेद हिने एका टास्क दरम्यान, तान्या आणि अमाल यांच्या नात्याबद्दल चर्चा केली. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.