प्रसिद्ध अभिनेत्रीची फारच वाईट अवस्था, रुग्णालयातले फोटो पोहून चाहते हादरले; नेमकं काय घडलं?
सिनेसृष्टीत मोठं नाव असलेल्या एका अभिनेत्रीला हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. तिचे हॉस्पिटलमधील फोटो पाहून सगळे चिंता व्यक्त करत आहेत.

Khanzadi Admitted To Hospital : बॉलिवुडमध्ये नेहमीच काहीतरी घडत असतं. कधी एखादा अभिनेता अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो. तर कधी दोन कलाकारांचे ब्रेकअप होतो. घटस्फोट हा प्रकार तर सिनेसृष्टीत नवा नाही. आतापर्यंत अनेक कलाकारांनी दोन किंवा त्यापेक्षा जास्त लग्न केलेले आहेत. कधी-कधी एखाद्या अभिनेता, अभिनेत्रीची प्रकृती खालावल्याचीही चर्चा वाऱ्यासारखी पसरते. असे असतानाच आता बिग बॉस हिंदीचे 17 वे पर्व गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री आणि रॅफर खानजादी म्हणजेच फिरोजा खानची प्रकृती बिघडली आहे. सध्या ती रुग्णालयात असून तिच्यावर उपचार केले जात आहेत. फिरोजा खान हिनेच स्वत: इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना याबाबत सांगितले आहे.
व्हिडीओ केला पोस्ट
फिरोजा खान म्हणजेच खानजादी हिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक स्टोरी ठेवली आहे. या स्टोरीमध्ये तिने हॉस्पिटलमधील व्हिडीओ पोस्ट केला आहे. फोटोमध्ये तिच्या हातावर आयव्ही ड्रिप लावल्याचे दिसत आहे. खानजादीचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कमेंटच्या माध्यमातून चाहते तिच्या प्रकृतीविषयी विचारणा करत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पोस्ट करताना कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. फक्त तिने हसरा चेहरा करून माझ्यासोबत नेमकं काय घडलं? याबाबत लवकरच मी सांगणार आहे, अशी माहिती तिने दिले आहे.
View this post on Instagram
अगोदरही जावे लागले होते हॉस्पिटलमध्ये
खानजादी लवकरच तिच्या सोशल मीडियावर एक ब्लॉग अपलोड करणार आहे. या ब्लॉगमध्ये तीन सगळी माहिती देणार आहे. तिला नेमकं काय झालं आहे? याबाबत ती सगळं काही सांगणार आहे. दरम्यान, याआधीही खानजादीला अनेकदा रुग्णालयात जावं लागलं होतं. बिग बॉसमध्ये असताना तिने अँकिलोसिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा आजार झाल्याचे सांगितले होते. या आजारामुळे तिला तब्बल तीन वर्ष चक्क व्हिल चेअरवर राहावे लागत होते. ती आजारी असतानाचा काळ फार बिकट होता, असेही तिने सांगितलेले आहे. बिग बॉसच्या 17 व्या पर्वात खानजादी आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विक्की जैन यांच्यात चांगली बॉण्डींग झाली होती. आता खानजादी आजारी असून तिला नेमकं काय झालं आहे? असे सगळीकडे विचारले जात आहे.
