बिग बॉस स्पर्धक मोठ्या विधानामुळे अडचणीत, म्हणालेली, ‘कुणासोबत झोपावं लागलं तरी झोपेन आणि…’

'कुणासोबत झोपावं लागलं तरी झोपेन आणि...', बिग बॉस स्पर्धकाने का केलेलं असं वक्तव्य... आता स्वतःच्या अशा विधानामुळे आली अडचणीत... व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बिग बॉस स्पर्धकाची चर्चा...

बिग बॉस स्पर्धक मोठ्या विधानामुळे अडचणीत, म्हणालेली, कुणासोबत झोपावं लागलं तरी झोपेन आणि...
Chandrika Dixit
| Updated on: Mar 17, 2026 | 8:38 AM

बिग बॉस स्पर्धक आणि वडापाव गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली चंद्रिका दीक्षित पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रिका हिचा एका जुन्या पॉडकास्टमधील छोटी क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये चंद्रिया मुलांसाठी अखेरच्या टप्प्यापर्यंत जाईल असं म्हणाली होती…. ‘मुलाचा सांभाळ करण्यासाठी कुणासोबत झोपावं लागलं तरी झोपेन…’, असं वक्तव्य वडापाव गर्लने केलं होतं. याच वक्तव्यामुळे चंद्रिका आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. चंद्रिका हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिचा मित्र सैफ तिच्यावर भडकताना दिसत आहे. सैफी म्हणतो, ‘मुलाचा सांभाळ करण्यासाठी तू कोणासोबत बेडवर झोपशील… इतकी घाणरडे विचार आहेत तुझे…?’ पुढे चंद्रिका म्हणते, ‘तू बाजूला हो… मला या लोकांसोबत बोलायचं आहे…’

स्वतःनेच केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत चंद्रिका दीक्षित म्हणाली, ‘ओळख छोटी असो किंवा मोठी… 3 हजार फॉलोअर्स असो किंवा मिलियन… प्रत्येक जन व्ह्यूजसाठी भुकेला आहे… फक्त माझ्या एका वाक्यावर व्हिडीओ तयार करत आहेत… तुम्ही तो संपूर्ण साडेतीन तासांचा पॉडकास्ट पाहिला आहे…? मी तेव्हा खूप काही बोलली होती, पण फक्त त्याच वाक्यावर अधिक जोर देण्यात येतोय?’

 

 

‘रस्त्यावर दुकान लावणं, विटा उचलणं, चपाती बनवणं, दगड वेचणं… सगळी कामं करायला मी तयार आहे. पण जेव्हा इतर सर्व पर्याय संपतील, तेव्हा मी शेवटचा पर्याय म्हणून ते काम करेन. पण मी कधीही आत्महत्या करणार नाही. माझ्या अंगात असलेल्या सर्व शक्तीनिशी मी लढेन. त्यात काय चुकीचं आहे?’ असं देखील चंद्रिका म्हणाली.

पुढे चंद्रिका म्हणाली, ‘कोण काय बोलतंय मला काहीही फरक पडत नाही. कारण मी मानसिक दृष्ट्या कणखर आहे… पण व्ह्यूजच्या नादात लोकं कोणाच्याही चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात… कोणी मला सांगतंय, चपाती बनव, विटा उचल, सगळं कर…. पण जेव्हा काहीच उरणार नाही, तेव्हा मी हेही करेन, पण मी जिवंत राहीन.’ असं देखील चंद्रिका संतापात म्हणाली,. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून चंद्रिका खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us