AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सच्च्या कलाकाराला बाहेर काढलात..; ‘बिग बॉस मराठी 6’च्या घरातून ‘चांगला माणूस’ बाहेर, नेटकऱ्यांची तीव्र नाराजी

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरातून सहाव्या आठवड्यात एका स्पर्धकाला बाहेर पडावं लागलं. या स्पर्धकाचं नाव जाहीर होताच घरातील इतर सर्वजण रडू लागले. चांगला माणूस म्हणून या स्पर्धकाने ओळख बनवली होती.

सच्च्या कलाकाराला बाहेर काढलात..; 'बिग बॉस मराठी 6'च्या घरातून 'चांगला माणूस' बाहेर, नेटकऱ्यांची तीव्र नाराजी
Bigg Boss Marathi 6 Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 23, 2026 | 10:58 AM
Share

‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सिझनचा खेळ आता चांगला रंगात आला आहे. घरातील सदस्यांचं वागणं, एकमेकांवरील कुरघोडी, कट-कारस्थानं, गेम-प्लॅनिंग अशा सर्व गोष्टी प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. या सिझनचा सहावा आठवडा नुकताच संपुष्टात आला असून या आठवड्याअखेर बिग बॉसच्या घरातून एकाला बाहेर पडावं लागलं आहे. रविवारी भाऊच्या धक्क्यावर सूत्रसंचालक रितेश देशमुखने ते नाव अखेर जाहीर केलं आणि त्या स्पर्धकाचं नाव ऐकताच घरातील सर्व सदस्यांना रडू कोसळलं. सहाव्या आठवड्यात सागर, राकेश, दीपाली, रोशन, अनुश्री, रुचिता, सचिन, प्राजक्ता आणि प्रभू असे एकूण नऊ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. या नऊपैकी सहा जण सुरक्षित ठरले आणि तीन जण डेंजर झोनमध्ये गेले.

रोशन, रुचिता आणि सचिन हे तिघे डेंजर झोनमध्ये होते. तिघांपैकी एकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागणार होतं. अखेर रितेशने ते नाव जाहीर केलं. सहाव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून गायक आणि खान्देशचा किंग म्हणून ओळखला जाणारा सचिन कुमावत एलिमिनेट झाला. घरातील एक चांगला माणूस म्हणून त्याने प्रेक्षकांमध्ये ओळख बनवली होती. परंतु बिग बॉसचा खेळ त्याला फारसा समजलेला नव्हता. अत्यंत साध्या स्वभावाचा सचिन बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचं गेम-प्लॅनिंग, कट-कारस्थान ओळखण्यात कुठेतरी कमी पडला, अशी भावना नेटकरी व्यक्त करत आहेत.

सचिन दादा मनाने चांगले आहात, पण असा शो तुमच्यासाठी नाहीये. इथे साधी सरळ माणसं नाही राहू शकत, अशी कमेंट एका युजरने केली. तर माणुसकीचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन भाऊ, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. चांगल्या माणसालाच बिग बॉसच्या घरातून बाहेर काढलं जातं, बिग बॉसकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान बिग बॉसचा खेळ दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालला आहे. स्पर्धक एकमेकांवर कुरघोडी करून स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात अखेरपर्यंत कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...