Bigg Boss Marathi 6: रुचिताची हकालपट्टी… रितेश देशमुख का संतापला? भाऊच्या धक्क्यावर कोणतं वादळ येणार?

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी 6' सीझन आता रंगत आला आहे. दिवसागणिक खेळ वेगळ्या टप्प्यावर जात आहे. दिव्या शिंदे हिच्या घरातून झालेल्या अचानक एक्झिटनंतर रितेश देशमुख, रुचिता हिच्यावर चांगलाच संतापला आहे. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर कोणतं वादळ येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

Bigg Boss  Marathi 6: रुचिताची हकालपट्टी... रितेश देशमुख का संतापला? भाऊच्या धक्क्यावर कोणतं वादळ येणार?
अभिनेता रितेश देशमुख
| Updated on: Feb 14, 2026 | 1:20 PM

Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka Promo: ‘बिग बॉस मराठी 6’ सीझनची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त ‘बिग बॉस मराठी 6’ शोची चर्चा पाहायला मिळत आहे. ओमकार राऊत बाहेर गेल्यानंतर, बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंत हिची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाला आहे. राखी हिच्यामुळे खेळात नवीन रंग भरले जात आहेत. सुरुवातीला राखी हिला बिग बॉसने विशेष अधिकार दिले.. तर आता घरातील अनेक गोष्टींमध्ये राखी स्वतःचं मत मांडताना दिसत आहे. तर राखी हिच्यामुळे अनेक स्पर्धकांचा खेळ देखील समोर येऊ लागला आहे. आज शनिवार आहे, त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोशल मीडियावर प्रोमो देखील व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये अभिनेता आणि शोचा होस्ट रितेश देशमुख, रुचिता हिच्यावर चांगलाच संतापलेला दिसत आहे.

रुचिता हिच्यावर निशाणा साधत रितेश म्हणतो, ‘दिपाली यांच्याकडे बघून तुम्ही काय केलं? आ… धू…! तुम्ही थुंकलात… तुम्ही जे वागलात ते महाराष्ट्रातील कोणत्याच आईला आवडलेलं नसेल…’ रितेश असं म्हणाल्यानंतर रुचिता तोंड फिरवून विचित्र हावभाव देते… ते पाहिल्यानंतर रितेश अधिक संतापतो आणि म्हणतो, ‘ओ तुम्हाला जर असं करायचं असेल तर, असे एक्स्प्रेशन द्यायचे असतील कर आत जा! भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही… अप अँड गो… ही स्क्रिन बंद करा…’ असं देखील संतापात रितेश म्हणाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

सांगायचं झालं तर, यंदाच्या आठवड्यात एका टास्क दरम्यान, रुचिता हिने दिपाली हिच्याकडे पाहून चुकीचं वर्तन केलं. ज्याचा जाब विचारत असताना रितेश भडकला… त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एवढंच नाही तर, राखी हिने बिग बॉसत्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं आहे. त्यामुळे, रितेश राखी हिला काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बिग बॉसच्या घरातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, बिग बॉसच्या घरात आता दोन गट झाले आहेत. रुचिता, विशाल, रोशन, अनुश्री या चौघांची टोळी झाली आहे तर, दिपाली, तन्वी आणि राकेश यांचा एक ग्रुप तयार झाला आहे…

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us