Aaliya Siddiqui | आलिया सिद्दीकीला अश्रू अनावर, मोठा झटका, ‘बिग बॉस ओटीटी 2’ मधून…

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करताना आलिया सिद्दीकी ही दिसली होती. इतकेच नाही तर यांचा वाद थेट कोर्टात पोहचला. हे सर्व सुरू असतानाचा आलिया सिद्दीकी हिने अत्यंत मोठा निर्णय घेत बिग बाॅस ओटीटीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आलिया बिग बाॅस ओटीटीमध्ये काय खुलासे करते याकडे सर्वांच्या नजरा होत्या.

Aaliya Siddiqui | आलिया सिद्दीकीला अश्रू अनावर, मोठा झटका, बिग बॉस ओटीटी 2 मधून...
| Updated on: Jun 28, 2023 | 10:20 AM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आलिया सिद्दीकी हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीमधील वाद इतका जास्त वाढला की तो थेट कोर्टात पोहचला. आलिया सिद्दीकी हिने मध्यरात्री एक व्हिडीओ (Video) शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याच्या घराबाहेर आलिया आणि तिचे मुले दिसत होती. या व्हिडीओमध्ये आलिया हिने दावा केला होता की, नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्याला घराबाहेर काढले असून आपल्याकडे पैसे देखील नाहीत.

काही दिवसांपूर्वीच आलिया ही मुंबईमध्ये दाखल झाली होती. दुबईवरून मुंबईत आल्यापासून सतत नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर आरोप आलिया हिने केले. आलिया सिद्दीकी ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाली. बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये आलिया नेमके काय खुलासे करते याकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, घरात काही धमाकेदार गेम खेळताना आलिया दिसली नाहीये.

नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार आलिया सिद्दीकी ही बिग बाॅस ओटीटी 2 मधून बाहेर पडलीये. लाईव्ह फिटमध्येही आलिया सिद्दीकी दिसत नाहीये. आलिया सिद्दीकी ही मिड विक अॅविक्शनमध्ये बाहेर पडली आहे. विशेष म्हणजे बिग बाॅस ओटीटीमधून बाहेर पडताना आलिया ही ढसाढसा रडताना दिसली आहे.

आलिया सिद्दीकी ही बिग बाॅस ओटीटी 2 मधून बाहेर पडल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. सोशल मीडियावर लोक आलिया सिद्दीकी हिला सपोर्ट करताना दिसत आहे. अनेकांनी पोस्ट शेअर करत बिग बाॅस ओटीटीच्या निर्मात्यांना खडेबोल सुनावले आहेत. काही दिवसांपूर्वीच पूजा भट्ट हिच्यासोबत आलिया हिचा वाद झाला होता.

आलिया सिद्दीकी ही बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडताना पूजा भट्ट ही तिला बोलताना देखील दिसली नाहीये. 26 जूनला घरातील सर्व सदस्यांनी मिळून नॉमिनेशनमध्ये आलिया हिला टाकले होते. आलिया सिद्दीकी ही सोशल मीडियावरही सतत सक्रिय दिसत आहे. आता बिग बाॅस ओटीटीमधून बाहेर पडल्यानंतर आलिया काय भाष्य करते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.