AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bipasha Basu : नवीन प्रोटीन डबा उघडला अन् धक्काच! बिपाशा बसूने तुकाराम मुंढेंना केलं टॅग

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूचा एक व्हिडीओ समोर आलाय. प्रोटीन प्रॉडक्टमधून किडे निघाल्याची तक्रार तिने केली आहे. तिने महाराष्ट्र FDA कमिश्नर तुकाराम मुंढे यांना टॅग करत मदत मागितली आहे.

Bipasha Basu : नवीन प्रोटीन डबा उघडला अन् धक्काच! बिपाशा बसूने तुकाराम मुंढेंना केलं टॅग
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 10, 2026 | 3:46 PM
Share

Bipasha Basu And Tukaram Mundhe : देशात गेल्या काही काळापासून फूड सेफ्टीचा मुद्दा चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या काही काळात अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावरून एफडीएकडून महाराष्ट्रात जोरदार कारवाई करण्यात आल आहे. याचदरम्यान आता बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) हिनेही तुकाराम मुंढे यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. खरंतर, बिपाशाने एक व्हिडिओ शेअर करत लिक्विड प्रोटीन प्रॉडक्टमध्ये कीडा आढळल्याची तक्रार केली आहे. तिने न्यूट्रिशन प्रोडक्टशी संबंधित फूड सेफ्टीच्या समस्येबाबत चिंता व्यक्त केली.

बिपाशाने आज (10 सप्टेंबर) तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला. तिने एका न्यूट्रिशन प्रॉडक्टचा नवा डबा ओपन केला. मात्र त्या डब्यात छोटे-छोटे किडे आढळले, असा दावा बिपाशाने आपल्या व्हिडीओतून केलाय. या पोस्टमध्ये बिपाशाने तुकाराम मुंढे यांना टॅग करत त्यांच्याकडून मदतही मागितली.

तुकाराम मुंढे यांना टॅग करत काय म्हणाली बिपाशा?

आज बिपाशा आपे तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या न्यूट्रिशन प्रोडक्टचा व्हिडिओ अपलोड केला. व्हिडिओमध्ये तिने ते प्रॉडक्ट झूम करून दाखवले. मी नुकताच एक नवीन डबा घेतला होता. मात्र, तो उघडल्यानंतर त्यामध्ये छोटे-छोटे कीटक आढळले असं अभिनेत्री सांगितलं. हा व्हिडिओ शेअर करताना पुढे बिपाशाने म्हटलं. ‘तुकाराम मुंढे, तुम्हीच आमची एकमेव आशा आहात. जेणेकरून आम्ही लोकं जे खरेदी करतो त्या वस्तूंमध्ये कोणतीही भेसळ नसावी किंवा त्या खराब झालेल्या नसाव्यात.’ यासोबत बिपाशाने हात जोडलेला इमोजीही वापरला आहे.

कोल्ड ड्रिंकसोबत कॉकरोच

दरम्यान एखाद्या फिल्मी कलाकाराने तुकाराम मुंढे यांच्यासमोर अशा प्रकारची तक्रार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी हिने मुंढे यांना टॅग करत एका क्विक-कॉमर्स ॲपविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. मी एका क्विक-कॉमर्स अॅपवरून कोल्ड ड्रिंक मागवलं होती. मात्र, कोल्ड ड्रिंकसोबत एक झुरळही घरी पोहोचलं, असं तिने म्हटलं होतं. “आम्ही कोल्ड ड्रिंक मागवलं आणि त्यासोबत आमच्या घरात एक झुरळंही आलं.. आता ते घरभर पळतंय. ” पुढे श्वेताने लिहीलं, “ मग तुकाराम मुंढे यांना टॅग करावे का? मुंढे जी, आमच्या घरात कॉकरोच येत आहेत. तुम्ही कुठे आहात? कृपया याकडे लक्ष द्या.” तिच्या या पोस्टची बरीच चर्चा झाली होतीय

सलमान खाननेही केला होता तुकाराम मुंढे यांचा उल्लेख

तुकाराम मुंढे अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई करताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केलंय. एका पोस्टमध्ये सलमान खाननेही त्यांचा थेट नाव न घेता उल्लेख केला होता. काही काळापूर्वी सलमानच्या एका मैत्रिणीने कॅफे सुरू केला होता. “स्वच्छतेची काळजी घे, नाहीतर मी त्यांना पाठवून देईन.” मजेशीर अंदाजात त्यावेळी सलमानने अशी पोस्ट केली होती.

Follow Us
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र.
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र अघोरी प्रकाराची चर्चा
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचाली...
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचालींना वेग
भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी...
Nashik | 15 कोटींचा पैशांचा पाऊस पाडतो! भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी, बाकी...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना सवाल
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला..
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला...
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा!
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा! नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके म्हणाले..
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके बोलता बोलता हे काय म्हणाले?
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी जाहीर
जालन्यात गुटख्यावर मोठी कारवाई; 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त
जालन्यात गुटख्यावर मोठी कारवाई; 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त