AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अभिनेता अक्षय कुमार याच्या गाडीचा मोठा अपघात, थेट पलटी होत…

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या गाडीचा मोठा अपघात झाल्याची माहिती मिळतंय. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी अक्षय कुमार आणि त्याची पत्नी गाडीत होते. अपघातानंतर अक्षय कुमार याने जखमी ऑटो चालकाला लगेचच मदत पोहोचवण्याचा सूचना दिल्या.

मोठी बातमी! अभिनेता अक्षय कुमार याच्या गाडीचा मोठा अपघात, थेट पलटी होत...
Akshay Kumar car accident
| Updated on: Jan 20, 2026 | 7:45 AM
Share

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या गाडीचा मोठा अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, गाडीने थेट पलटी मारली. अक्षय कुमार पत्नीसोबत विमानतळावरून जुहू येथील बंगल्याकडे निघाला होता. यादरम्यान अक्षय कुमार आणि त्याची पत्नी एकाच गाडीत होते. त्यांच्या गाडीच्या मागे त्यांच्या सुरक्षारक्षकांची कार होती. यादरम्यान एक मर्सिडीज कारचे नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि त्या मर्सिडीजने अगोदर ऑटोला धडक दिली. त्यानंतर ही कार अक्षय कुमार याच्या सुरक्षारक्षकांच्या कारला येऊन धडकली. पुढे अक्षय कुमार असलेल्या कारलाही थोडी धडक बसल्याची माहिती मिळतंय. मात्र, ज्यावेळी अक्षय कुमार याच्या सुरक्षारक्षकांच्या कारला मर्सिडीजने धडक दिली त्यावेळी ती थेट पलटी झाली.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑटो चालकाला लगेचच मदत पोहोचवण्याचे काम करण्यात आले. अक्षय कुमार याने त्याच्या सुरक्षारक्षकांना ऑटो चालकाला रूग्णालयात लगेचच घेऊन जाण्याच्या सूचना दिल्याचीही माहिती मिळत आहे. या अपघातानंतर लोकांनी मोठी गर्दी झाली. अनेकांनी अपघातानंतर थेट व्हिडीओ देखील काढली. सध्या पोलिस या अपघात प्रकरणात तपास करत असल्याचे कळत आहे.

अजून तरी अपघाताप्रकरणी कोणत्याही प्रकारची एफआयआर दाखल करण्यात आली नाही. मर्सिडीज चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला की, कारण अजून काही वेगळे आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणात अक्षय कुमार किंवा त्याच्या टीमकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. अक्षय कुमार बसलेल्या गाडीचे काही फार नुकसान झाले नसले तरीही त्याच्या सुरक्षारक्षकांच्या गाडीचे नुकसान झाल्याचे कळतंय.

अपघात झाल्यानंतर काही वेळात अक्षय कुमार तेथून निघून गेला. मात्र, त्याठिकाणी त्याचे सुरक्षारक्षक होते. ऑटो चालकावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात नक्की चुकी कोणाची याचा शोध घेतला जात आहे. अक्षय कुमार शूटिंग करून घरी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.